सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, जाणून घ्या भाव

सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, जाणून घ्या भाव

सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर

गुरुवारी सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. राजधानी दिल्लीत सोन्याच्या किंमतीत प्रति १० ग्रॅम ४८८ रुपयांची घट झाली आहे. या घसरणीमुळे दिल्लीतील सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४९ हजार १३५ रुपयांवर गेला आहे. गेल्या सत्रात बुधवारी सोन्याचे दर १० ग्रॅम ४९ हजार ६२३ रुपयांवर पोहोचला होता.

देशांतर्गत सराफ बाजार सोन्यासह चांदाच्या दरात देखील मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. गुरुवारी चांदीच्या किंमतीत १ हजार १६८ रुपये प्रति किलोग्रॅम घट झाली आहे. यामुळे चांदीची किंमत ५० हजार ३२६ रुपये प्रतिकिलो झाली आहे. गेल्या सत्रात बुधावरी चांदीची किंमत ५१ हजार ४९४ रुपये प्रतिकिलो ग्रॅम होती.

एचडीएफसी सिक्युरिटीचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, रुपयाच्या वाढीमुळे सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे. गुरुवारी भारतीय रुपया एक डॉलरच्या तुलनेत ५६ पैशांनी मजबूत होऊन ७५.०४ च्या ट्रेंडवर होता.

भारतीय सोनेबाजारात सोन्याची किंमत ही उच्चतम पातळीवर पोहोचली होती. जागतिक बाजारात सोन्याच्या वाढत्या मागणीमुळे सोन्याच्या किंमतीत वाढ झाली होती. मात्र गुरुवारी सोन्याच्या आणि चांदीच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे.


हेही वाचा – Corona Update: राज्यात आतापर्यंत १ लाखांहून अधिक रुग्णांनी केली कोरोनावर मात!


 

First Published on: July 2, 2020 10:52 PM
Exit mobile version