Independence Day 2022: भारताच्या राजकारणातील रणरागिणी

Independence Day 2022: भारताच्या राजकारणातील रणरागिणी

भारताला स्वातंत्र्य मिळून आता ७५ वर्षे पूर्ण होतील. या ७५ वर्षांत बरेच बदल झाले. या बदलांना क्रांतीदेखील म्हणता येईल. तंत्रज्ञान विकसित झालं. दळणवणाची साधनं विस्तारली गेली. राहणीमान सुधारलं, शैक्षणिक प्रगती झाली. विविध संशोधन मार्गी लागले. या सर्व विकसित घडामोडींमध्ये महिलांनीही विविध क्षेत्रांत आपलं करिअर आमजावलं. प्रत्येक क्षेत्रातील पुरुषांची मक्तेदारी मोडून काढत महिलांनी आजमितिस अनेक क्षेत्र पादक्रांत केले आहेत. त्यातलीच एक क्षेत्र म्हणजे राजकारण. (Top women politicians in India)

हेही वाचा – Independence Day 2022 : भारतातल्या ‘या’ 6 सौंदर्यवतींनी पटकावला मिस वर्ल्ड होण्याचा मान

स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना ५० टक्के राजकीय आरक्षण आहे. त्यामुळे अनेक महापालिका, नगरपंचायत, पंचायत समितीत महिलांचं वर्चस्व दिसून येतं. पण महिलांनी आपला आवाका केवळ मर्यादित स्वरुपात ठेवला नाही तर राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय राजकारणातही त्यांचं नेतृत्त्व वाखणण्याजोगं आहे. भारतीय लोकसंख्येच्या तुलनेत राजकारणात महिलांची संख्या तुलनात्मक कमी असली तरीही राजकारणात उच्च पदावर महिलांनी नेतृत्व केलं आहे. स्वातंत्र्याच्या पंच्च्याहत्तरीत महिलांची संख्या कमी असली तरीही स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव साजरा करू तेव्हा ही संख्या वाढलेली दिसेल. भारताच्या राजकारणात सक्रीय सहभाग घेतलेल्या काही रणरागिणींविषयी जाणून घेऊयात.

आयर्न लेडी इंदिरा गांधी (Iron Lady Indira Gandhi)

स्वातंत्र्य लढ्यात ज्याप्रमाणे महिला कार्यरत होत्या, त्याचप्रमाणे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही राजकारणात महिलांनी सक्रीय सहभाग घेतला. त्यातील पहिलं नाव म्हणजे इंदिरा गांधी (Indira Gandhi). भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून बिरूद मिरवणाऱ्या इंदिरा गांधी यांचं राजकारणातील योगदान महत्त्वाचं आहे. लाल बहादूर शास्त्री यांच्या निधानंतर त्यांनी मोरारजी देसाई यांच्याविरोधात राजकीय लढाई करून पंतप्रधान पदाची रेस जिंकली. १९६६ मध्ये देशाच्या पाचव्या आणि महिला म्हणून पहिल्या पंतप्रधान बनल्या. बांगलादेशची फाळणी आणि देशाला अणुशक्ती संपन्न बनवण्याचा त्यांचा संकल्प भारतासाठी महत्त्वपूर्ण ठरला. १९७५ साली त्यांनी देशात आणीबाणीसारखा निर्णय घेऊन संपूर्ण देशवासियांचा राग ओढावून घेतला होता. मात्र, तरीही १९८० च्या निवडणुकीत जनतेने त्यांच्यावर विश्वास दाखवला. आपल्या राजकीय वाटचालीत अनेक खाचखळगे सहन करून, वेळप्रसंगी कठोर निर्णय घेऊन, देशाला वेगळी दिशा देऊन त्यांनी महत्त्वाचं काम केलं. म्हणूनच त्यांना देशाची आयर्न लेडी म्हणून संबोधलं जातं. अखेर, त्यांच्याच सुरक्षारक्षकांकडून त्यांची हत्या करण्यात आली.

हेही वाचा – Independence Day 2022: तिरंग्यातील अशोक चक्राचा रंग निळा का असतो? काय आहे महत्त्व?

शक्तीशाली महिला सोनिया गांधी (Sonia Gandhi)

इंदिरा गांधी यांच्यानंतर गांधी कुटुंबानेच दुसरं महिला नेतृत्त्व म्हणून सोनिया गांधी यांना संधी दिली. सोनिया या मूळच्या इटलीच्या असून त्यांचा राजकारणाची काहीही संबंध नव्हता. सासू इंदिरा गांधी आणि पती राजीव गांधी यांच्या हत्येनंतर त्यांनी राजकारणात सक्रीय सहभाग घेतला. ज्या क्षेत्रामुळे दोन जीवलगांची हत्या झालेली असतानाही धारिष्ट्य दाखवत त्यांनी राजकारणात एन्ट्री घेतली. १९९१ मध्ये राजीव गांधी यांची हत्या झाली. त्यानंतर सात वर्षांनी म्हणजेच १९९८ साली काँग्रेस पक्षाची धुरा सोनिया गांधींकडे आली. तेव्हापासून २०१७ पर्यंत त्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष राहिल्या. २०१७ मध्ये काँग्रेसचं राष्ट्रीय अध्यक्षपद राहुल गांधी यांच्याकडे देण्यात आले. मात्र, राहुल गांधी यांनी हे पद सोडल्याने सध्या हंगामी अध्यक्षा म्हणून सोनिया गांधीच काँग्रेसची धुरा सांभाळत आहेत. दरम्यान, त्या रायबरेली येथून खासदार म्हणूनही निवडून आल्या होत्या. तसंच, फोर्ब्समध्ये त्यांचं नाव शक्तीशाली महिला यादीत समाविष्ट झालं होतं.

हेही वाचा – Independence Day 2022 : भारतीय महिला आणि त्यांचे सुप्रसिद्ध ब्रँड

एकही निवडणूक न हरलेल्या प्रतिभा पाटील (Pratibha Patil)

इंदिरा गांधी आणि सोनिया गांधींनंतर ज्यांचं नाव आदराने घेतलं जातं त्या म्हणजे प्रतिभाताई पाटील. महाराष्ट्रानेही महिला नेतृत्त्वाला वाव देऊन भारताच्या उच्चपदावर विराजमान केलं. प्रतिभा पाटील या भारताच्या १२ व्या आणि पहिल्या महिला राष्ट्रपती ठरल्या होत्या. राष्ट्रपती होण्याआधी त्या राजस्थानच्या १६ व्या राज्यपाल आणि प्रथम महिला राज्यपाल होत्या. १९६७ ते १९८५ पर्यंत त्या मुक्ताईनगर तालुक्याच्या आमदार होत्या. त्यानंतर त्या अमरावतीतून खासदार म्हणून निवडून आल्या. तर, २००७ साली त्यांची भारताच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली. प्रतिभाताई पाटील या जगातील अशा एकमेव महिला राष्ट्रपती होत्या की ज्या एकही निवडणूक हरल्या नाहीत. एवढंच नव्हे तर त्यांनी आपल्या राष्ट्रपती पदाच्या कार्यकाळात सुखोईसारखे लढाऊ विमान चालवले.

आवडत्या राजकारणी सुषमा स्वराज (Sushama Swaraj)

संसदेच्या सदस्या म्हणून सात वेळा निवडून आलेल्या आणि भारताचे परराष्ट्र मंत्री पद भुषवलेल्या राजकीय नेत्या म्हणजे सुषमा स्वराज. वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी त्या कॅबिनेट मंत्री बनल्या होत्या. तर, दिल्लीचेही मुख्यमंत्री पद त्यांनी भुषवले आहे. २००० ते २००९ मध्ये त्या राज्यसभेच्या सदस्या होत्या. २००९ ते २०१४ दरम्यान, लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या होत्या. २०१४ मध्ये खासदार म्हणून जिंकून आल्यानंतर त्यांना केंद्रीय कॅबिनेटमध्ये परराष्ट्र मंत्री बनवण्यात आले. २०२० मध्ये त्यांना सार्वजनिक व्यवहार क्षेत्रातील मरणोत्तर पद्मविभूषण हा भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. दरम्यान, अमेरिकेतील प्रसिद्ध दैनिक वॉल स्ट्रीट जर्नलने स्वराज यांना भारताच्या आवडत्या राजकारणी म्हणून निवडले होते.

पहिल्या महिला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banarjee)

भारताच्या सक्रीय राजकारणात मोजक्या महिलांचं नाव आदराने घेतलं जातं. त्यापैकी एक नाव म्हणजे ममता बॅनर्जी. भाजपासारख्या राष्ट्रीय पक्षाविरोधात उभ्या राहूनही त्यांनी पश्चिम बंगालमध्ये एकहाती सत्ता मिळवली. सडेतोड आणि आक्रमक शैलीमुळे त्या सर्वपरिचित आहेत. ३४ वर्ष सत्ता गाजवलेल्या सरकारला पाडून ममता बॅनर्जी भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनल्या होत्या. सध्या भारतीय राजकारणात ममता बॅनर्जी यांचा दबदबा दिसून येतो.

पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu)

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या नुकत्याच भारताच्या राष्ट्रपती पदावर विराजमान झाल्या आहे. आदिवासी समाजातील त्या पहिल्या राष्ट्रपती ठरल्या आहेत. वॉर्ड कॉऊन्सलरपासून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. रायरंगपूर नगर परिषदेत त्या १९९७ साली नगरसेवक म्हणून निवडून आल्या. काही काळ त्यांनी नगर परिषदेचं उपाध्यक्षपदही स्विकारलं. तसंच, भाजपच्या तिकिटावरून रायरंगपूर विधानसभा मतदारसंघातून त्या २००० आणि २००९ साली आमदार झाल्या. नवीन पटनायक यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम सांभाळलं. दरम्यान, झारखंडच्या त्या पहिल्या महिला राज्यपालही राहिल्या आहेत. तसेच, आदिवासी समाजाचं प्रतिनिधित्व करणाऱ्याही त्या पहिल्या राज्यपाल ठरल्या होत्या. त्यात आता त्या आदिवासी समाजाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या पहिल्या महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत.

First Published on: August 10, 2022 2:49 PM
Exit mobile version