घर मनोरंजन Independence Day 2023 : भारतातल्या 'या' 6 सौंदर्यवतींनी पटकावला मिस वर्ल्ड होण्याचा...

Independence Day 2023 : भारतातल्या ‘या’ 6 सौंदर्यवतींनी पटकावला मिस वर्ल्ड होण्याचा मान

Subscribe

1951 पासून चालू असलेल्या मिस वर्ल्ड या आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत भारतातील एकूण 6 स्रियांनी मिस वर्ल्ड होण्याचा किताब जिंकला आहे.

भारताला स्वातंत्र्य मिळून 76 वर्ष पूर्ण झाली. यंदा आपण भारताचा 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहोत. गेल्या 76 वर्षापासून भारताने अनेक क्षेत्रात मानाचे स्थान प्राप्त केले आहे. या सगळ्या यशामध्ये केवळ पुरूषचं नाहीत तर महिलांचा देखील मोठा वाटा आहे. शेती, शिक्षण, उद्योग, कला, क्रिडा, विज्ञान यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये महिला पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून बाजी मारताना दिसतात. जगभरामध्ये प्रत्येक वर्षी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेमध्ये देखील भारतातल्या अनेक स्त्रियांनी बाजी मारून भारताचे नाव अभिमानाने उंचावले आहे.

1951 पासून चालू असलेल्या मिस वर्ल्ड या आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत भारतातील एकूण 6 स्रियांनी मिस वर्ल्ड होण्याचा किताब जिंकला आहे.

- Advertisement -

रीता फारिया


रीता फारिया ही फक्त भारतातील नव्हे तर संपूर्ण आशियातील पहिला महिला होती जिने मिस वर्ल्ड हा किताब जिंकला होता. रीता फारिया 1966 मध्ये मिस वर्ल्ड झाली. रीता फारिया ही गोव्यातील एक मॉडल आणि डॉक्टर होती.

- Advertisement -

ऐश्वर्या राय


अभिनेत्री ऐश्वर्या रायने 1994 साली मिस वर्ल्ड होण्याचा मान पटकावला. मिस वर्ल्ड झाल्यानंतर ऐश्वर्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

डायना हेडन


1997 साली डायना हेडनने मिस वर्ल्ड झाली होती. त्यानंतर तिने बॉलिवूडमधील तहजीब या चित्रपटामध्ये देखील काम केले आहे.

युक्ता मुखी


1999 साली मिस वर्ल्ड हा किताब जिंकणारी युक्ता मुखी चौथी भारतीय होती. स्पर्धे दरम्यान तिला मिस वर्ल्ड आशिया हा किताब देखील मिळाला होता.

प्रियांका चोप्रा


2000 मध्ये प्रियांकाने मिस वर्ल्ड होण्याचा मान पटकावला. प्रियांका चोप्रा सध्या ग्लोबल आयकॉन आहे. प्रियांकाने बॉलिवूडपासून ते हॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे.

मानुषी छिल्लर


2017 साली मानुषी छिल्लरने मिस वर्ल्ड होण्याचा मान पटकावला. नुकतेच मानुषीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. सम्राट पृथ्वीराजमध्ये ती अक्षय कुमारसोबत दिसून आली होती.


हेही वाचा : Independence Day 2023 : तिरंग्यातील अशोक चक्राचा रंग निळा का असतो? काय आहे महत्त्व?

- Advertisment -