‘तुर्की’चे झाले ‘तुर्कीये’ ; नामांतरणामागे हे आहे अजब कारण, वाचून व्हाल थक्क

‘तुर्की’चे झाले ‘तुर्कीये’ ; नामांतरणामागे हे आहे अजब कारण, वाचून व्हाल थक्क

'तुर्की'चे झाले 'तुर्कीये' ; नामांतरणामागे हे अजब कारण, वाचून व्हाल थक्क

भारतात विविध शहरांच्या जिल्ह्यांच्या नाव बदलाचे वारे आता तुर्की देशातही पोहचले असे म्हणावे लागेल. कारण तुर्की देशाचे नाव आता तुर्कीये असे झाले आहे. तुर्कीचे परराष्ट्रमंत्री मेवलुट चावुसोगलू यांनी संयुक्त राष्ट्रांना पत्र लिहून तुर्की देशाचे नाव बदलले असून आपल्या देशाचे नाव यापुढे ‘तुर्कीये’ असे म्हणण्यात यावे असे आवाहन केले. दरम्यान संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटारेस यांनी बुधवारी तुर्कीचे नाव बदलण्याची विनंती मान्य करण्यात आल्याची घोषणा केली. (turkey to turkiye)

गेल्या अनेक महिन्यांपासून तुर्की (turkey) सरकारकडून या नाव बदलासाठी प्रयत्न सुरु होते. यातून अध्यक्ष एद्रोगन यांचा तुर्कीचे ‘रिब्रँडिंग’ करण्याचे प्रयत्न आहेत. यावेळी टर्की हा पक्ष्याच्या नावातील साधर्म्यामुळे हा प्रयत्न होत असल्याचे सांगण्यात येते.

दरम्यान तर्कीत टर्की किंवा तुर्की हा शब्द नकारात्मक मानला जातो. त्यामुळे 1923 च्या स्वातंत्र्यापासून येथील नागरिक देशाचा उल्लेख तुर्किये म्हणून करत होते. दरम्यान राष्ट्राध्यक्ष एद्रोगनही अनेक वर्षांपासून आंतरराष्ट्रीय पातळीवर तुर्कियेला मान्यता मिळवून देण्याचा प्रयत्नशील होते. आता संयुक्त राष्ट्राने मान्यता दिल्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.

दरम्यान संयुक्त राष्ट्राच्या मान्यतेपासूनचं आता तुर्कीचा तुर्कीये म्हणून उल्लेख करण्यास देशात मान्यता देण्यात आली आहे. एद्रोगन यांनी यापूर्वीच तुर्कीची संस्कृती लक्षात घेवून तुर्कीच्या जागी तुर्कियेचा वापर करण्याचे आदेश दिले होते.

तेव्हापासून तुर्कीच्या विविध विभागांमध्ये तुर्कीच्या जागी ‘तुर्कीये’ असा उल्लेख करण्यात येत होता. तसेच, परदेशांत निर्यात करणाऱ्या वस्तूंवर ‘मेड इन तुर्कीये’ असे नमूद करण्यात येत आहे. याशिवाय पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या जाहिरातीमध्ये ‘हॅलो तुर्कीये’ असे म्हटले जातेय. सर्व राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय ‘तुर्कीये’ हेच नाव वापरले जाईल, यासाठी अध्यक्षांच्या जनसंज्ञापन संचलनालयाकडून मोहीम राबवण्यात येत आहे. ‘टीआरटी वर्ल्ड’ या तुर्कीच्या इंग्रजी भाषेतील राजकीय वाहिनीवरही ‘तुर्कीये’ शब्द वापरण्यास सुरुवात केली आहे. मात्र, निवेदकांकडून अधूनमधून ‘तुर्की’ असाच उल्लेख होताना दिसत आहे.

तुर्की शब्दावर आक्षेप का? why turkey changed its name

तुर्कीचे अनेक अर्थ काढले जातात. मात्र अनेक प्रकरणांमध्ये ते गृहीत धरले जात नाही विशेषत: इंग्रजीत तुर्कीला टर्की म्हटले जाते. मात्र ‘तुर्की’ या शब्दाचे इंग्रजीतील स्पेलिंग टर्की या पक्ष्याशी साधर्म्य साधणारे आहे. दरम्यान या उत्तर अमेरिकेत आढळणारा या पक्ष्याचे मांस ख्रिसमसनंतरच्या मेजवानीमध्ये देण्यात येते. भारतातही त्याला तीतर म्हटले जाते. एवढेच नाही तर ‘तुर्की’ शब्दाचा केंब्रिज शब्दकोशातील अर्थ अपयशी किंवा मूर्ख व्यक्ती असा होतो. त्यामुळे येथील नागरिकांची तुर्कीच्या नाव बदलाची इच्छा होती. मात्र तुर्कीश भाषेत तुर्कीला तुर्कियेच म्हटले जाते.


Coronavirus Maharashtra : महाराष्ट्रातील ‘या’ सहा जिल्ह्यांना कोरोनाचा सर्वाधिक धोका; केंद्राचे राज्य सरकारला पत्र

First Published on: June 3, 2022 8:31 PM
Exit mobile version