घरCORONA UPDATECoronavirus Maharashtra : महाराष्ट्रातील 'या' सहा जिल्ह्यांना कोरोनाचा सर्वाधिक धोका; केंद्राचे राज्य...

Coronavirus Maharashtra : महाराष्ट्रातील ‘या’ सहा जिल्ह्यांना कोरोनाचा सर्वाधिक धोका; केंद्राचे राज्य सरकारला पत्र

Subscribe

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या पुन्हा झपाट्याने वाढतेय. दररोज हजारांच्या आसपास रुग्ण आढळून येत आहेत. राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने राज्य सरकारला एक पत्र पाठवले आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, पुणे, रायगड या जिल्ह्यांतील रुग्णसंख्या वाढतेय ही चिंतेची बाब आहे असं या पत्रात नमुद करण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्य सचिव (union health secretary) राजेश भूषण (rajesh bhushan) यांनी राज्याचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास (health secretary) यांना हे पत्र पाठवले आहे. (Coronavirus Maharashtra)

गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची बैठक पार पडली, त्यापार्श्वभूमीवर आज लगेच केंद्राने राज्य सरकारला हे पत्र लिहिले आहे. या पत्रात राज्यांतील सहा जिल्ह्यांमध्य़े कोरोना चाचण्या, लसीकरण वाढवण्यावर भर देण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. तसेच कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्लाही केंद्राने दिला आहे.

- Advertisement -

राज्यातील वाढत्या कोरोना (Corona) रुग्णसंख्येबरोबरच मुंबईतही कोरोना (Mumbai Corona) रुग्ण वाढत आहेत. त्यामुळेच टास्क फोर्स पुन्हा एकदा कार्यरत झालेय. टाक्स फोर्सचे सदस्य राहुल पंडित यांनी कोरोनाला रोखण्यासाठी काही सल्ले दिलेत. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून एक हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहे. मुंबईत दररोज सातशेच्यावर रुग्ण आढळून येत आहेत. यातील गंभीर रुग्णांची संख्या लक्षात घेत त्यानुसार उपचार केले जावेत. पण मुंबई बहुतांश रुग्ण हे माईल्ड आहेत.

- Advertisement -

दरम्यान कामाची ठिकाणी तसेच गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे आवश्यक आहे. तसेच वयोवृद्ध, हाय रिस्क पेशंट, डायलिसिस वरील पेशंट यांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. तसेच पावसात हंगामी रोगांचा प्रादुर्भाव लक्षात घेत डॉक्टरांकडे जाऊन आजाराचे निदान करणे गरजेचं आहे. असा सल्ला दिला जात आहे.

दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने प्रत्येकाने स्वसंरक्षणासाठी मास्क वापरावा असा सल्ला दिला आहे. राज्यातील अनेक नेत्यांना आत्तापर्यंत कोरोनाची लागण झाल्याने कोरोनाला हलक्यात न घेण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे.


तरुणींनो, काळजी घ्या! होस्टेलच्या शॉवरमध्ये छुपा कॅमेरा, हार्डडिस्कमध्ये आढळले मुलींचे अश्लिल व्हिडिओ

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -