भारतामध्ये मुस्लीम अस्पृश्य झाले आहेत का?; UAE च्या राजकुमारीचा संतप्त सवाल

भारतामध्ये मुस्लीम अस्पृश्य झाले आहेत का?; UAE च्या राजकुमारीचा संतप्त सवाल

राजकन्या हेंद अल कासिमी (फाइल फोटो)

संयुक्त अरब अमिरातीच्या (युएई) राजकन्या हेंद अल कासिमी यांनी भारतातील कोरोनाशी संबंधित घटनांचा आधार घेत भारतामध्ये इस्लामसंदर्भात द्वेष का निर्माण केला जात आहे? असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कासिमी यासंदर्भात ट्विटरवरुन व्यक्त होत आहेत. दुबईमध्ये राहणारे भारतीयही इस्लामद्वेष व्यक्त करत आहेत. मात्र, हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा सज्जड दम कासिमी यांनी दिला होता. दरम्यान, भारतामध्ये मुस्लीमांना अस्पृश्य समजलं जात आहे का? असा सवाल त्यांनी आता उपस्थित केला आहे.

कासिमी यांनी सोमवारी ५ मे २०२० रोजी ट्विट केलं आहे. “भारतामध्ये मुस्लीमांकडे अस्पृश्य म्हणून पाहिलं जात आहेत का?” असं ट्विट राजकुमारी कासिमी यांनी केलं आहे.


हेही वाचा – भारतीय लोकांच्या मुस्लिमविरोधी पोस्टवरुन युएई नाराज; राजकुमारीने दिला इशारा


त्याआधी त्यांनी भारत हा आपला मित्र देश असल्याचं ट्विट करत म्हटलं होतं.

दरम्यान, याआधी त्यांनी भारतामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून, स्तारातुन सुरु असलेल्या इस्लामद्वेषाच्या घटनांचा आढावा घेणारा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. यामध्ये अगदी भाजपाच्या खासदारांनी केलेल्या वक्तव्यांपासून ते तबलिगी जमातसंदर्भातील बातम्यांचे संदर्भ देण्यात आलेले आहेत.

काही दिवसांपूर्वीच कासिमी यांनी दुबईस्थित भारतीयाने केलेल्या मुस्लीमद्वेषी ट्विटचे स्क्रीनशॉट शेअर करत याप्रकारचा द्वेष खपवून घेतला जाणार नाही असा सज्जड दम दिला होता. “द्वेष पसरवणारी आणि दुजाभाव करणारी टीका करणाऱ्याला दंड केला जाईल आणि त्याला दुबईतुन हाकलवून लावण्यात येईल,” असं म्हणत कासिमी यांनी काही फोटो शेअर केले होते.

 

First Published on: May 4, 2020 1:13 PM
Exit mobile version