लग्नसमारंभाचे हॉल, सिनेमागृहे, स्विमिंग पूल क्षमतेत ५० टक्क्यांपर्यंत वाढ, केंद्राची नवीन नियमावली जाहीर

लग्नसमारंभाचे हॉल, सिनेमागृहे, स्विमिंग पूल क्षमतेत ५० टक्क्यांपर्यंत वाढ, केंद्राची नवीन नियमावली जाहीर

केंद्रीय गृह मंत्रालयाने आज बुधवारी पुन्हा नव्या नियमावलीची घोषणा केली. देशभरात कोरोना रूग्णांची संख्या आणि मृत्यूचे कमी होत असतानाही पुन्हा एक नव्या नियमावलीची घोषणा करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे नव्या नियमावलीत सिनेमागृहे आणि स्विमिंग पूलच्या क्षमतेत वाढ करण्यात आली आहे. तर अनेक परवानग्यासाठी राज्य सरकारकडे जबाबदारी निश्चित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पण यापुढच्या काळातही मास्क वापरावेच लागणार हे केंद्राने स्पष्ट केले आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंग आणि हात स्वच्छ ठेवण्याचा नियम कायम ठेवण्यात आला आहे. कंटेन्टमेंट झोनसाठी जिल्हा पातळीवरील यंत्रणांना काटेकोरपणे कंटेन्टमेंट झोनच्या नियमावलीचे पालन करावे लागणार आहे. त्यामध्ये केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने वेळोवेळी निश्चित केलेल्या मार्गदर्शकांचा अवलंब करावा लागणार आहे. येत्या १ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारीपर्यंत ही नवीन मार्गदर्शके लागू असतील.

कंटेन्टमेंट झोन वगळून इतर क्षेत्रात सोशल डिस्टन्सिंगचे निकष पाळत परवानगी देण्यात आली आहे. तसेच सामाजिक, धार्मिक कार्यक्रम, क्रीडा, मनोरंजन, शिक्षण, सांस्कृतिक समारंभासाठी हॉलच्या क्षमतेच्या ५० टक्के इतकी परवानगी देण्यात आली आहे. तर बंदिस्त ठिकाणी कमाल मर्यादा २०० जणांसाठी परवानगी देण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी लवकरच हवाई उड्डाण मंत्रालयामार्फत लवकरच चर्चेनुसार निर्णय़ घेण्यात येईल. तर पॅसेंजर ट्रेन आणि हवाई वाहतूक, मेट्रो ट्रेन, शाळा, शैक्षणिक संस्था, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल्स, मल्टीप्लेक्स, मनोरंजन पार्क्स, योगा सेंटर, जिमनॅशिअम आदीसाठी स्टॅण्डर्ड ऑपरेटींग प्रोसिजरनुसार नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी लागेल.

आंतरराज्य तसेच राज्याअंतर्गत वाहतूकीसाठी कोणतीही बंधने नसतील. त्यामध्ये कराराअंतर्गत इतर देशांमधून व्यवसायाच्या निमित्ताने मालाची देवाणघेवाण यासारख्या गोष्टींसाठीही दिलासा देण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारचे ई परमिट लागणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. जेष्ठ नागरिकांसाठी ज्यांचे वय ६५ वर्षांहून अधिक आहे, गरोदर महिला, १० वर्षांच्या आतील मुले यांना आरोग्य सेतू एपचा वापर करून योग्य ती खबरदारी घेण्याचे सुचवण्यात आले आहे.

 

First Published on: January 27, 2021 8:48 PM
Exit mobile version