भाजपाकडून केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल तर एल. मुरुगन यांना राज्यसभेची उमेदवारी

भाजपाकडून केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल तर एल. मुरुगन यांना राज्यसभेची उमेदवारी

भाजपाकडून केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल तर एल. मुरुगन यांना राज्यसभेची उमेदवारी

आसाम आणि मध्यप्रदेशातील राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल आणि एल. मुरुगन यांना उमेदवारी देण्यात आली आहे, अशी माहिती भाजपाने आज शनिवारी जारी केलेल्या एका निवेदनात दिली आहे. राज्यसभेच्या सात रिक्त जागांसाठी येत्या ४ ऑक्टोबरला पोटनिवडणुका होणार असून भाजपने केंद्रीय बंदरे, जहाज उद्योग खात्याचे मंत्री सर्वानंद सोनोवाल व केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याचे राज्यमंत्री एल. मुरुगन यांना अनुक्रमे आसाम व मध्य प्रदेशमधून उमेदवारी दिली आहे. महाराष्ट्रातील जागेसाठी भाजपने अद्याप आपला उमेदवार जाहीर केलेला नाही.

दरम्यान, तमिळनाडूतून अण्णा द्रमुकचे राज्यसभा खासदार के. पी. मुन्नूस्वामी, आर. वैतलिंगम यांनी राजीनामा दिल्याने तिथे दोन जागा रिकाम्या झाल्या. मध्य प्रदेशात भाजपचे खासदार थावरसिंह गेहलोत यांची कर्नाटकचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाल्याने त्यांनी राज्यसभा खासदारकी सोडली.

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार मानस रंजन भुनिया यांनी राज्यात मंत्रिपद मिळाल्याने खासदारकीचा राजीनामा दिला. आसामच्या विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने तेथील राज्यसभा खासदार व भाजप नेते विश्वजित दायमारी यांनी खासदारकी सोडली. महाराष्ट्रात काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांचे निधन झाल्याने ती जागा रिक्त झाली होती. पुडुचेरीत अण्णाद्रमुकचे नेते गोकुळकृष्णन यांच्या राज्यसभा सदस्यत्वाची मुदत संपली होती. मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार असलेल्या राजीव सातव यांचा कोरोना संसर्गनंतर उपचारादरम्यान निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते कोरोनाशी झुंज देत होते. मात्र त्यांची ही झुंज अपयशी ठरली.

कोण होते राजीव सातव?

४५ वर्षीय राजीव सातव हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (एआयसीसी) चे गुजरात प्रभारी होते, तर काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे निमंत्रक होते.. राजीव सातव यांच्या मातोश्री रजनी सातव काँग्रेसच्या आमदार होत्या. शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडेंना पराभूत करुन राजीव सातव २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत हिंगोलीतून खासदारपदी निवडून आले होते. राजीव सातव यांच्या नेतृत्वात काँग्रेसने २०१७ मधील गुजरात विधानसभा निवडणुकीत चांगलं यश मिळवलं होतं. फेब्रुवारी २०१० ते डिसेंबर २०१४ या काळात त्यांनी भारतीय युवा काँग्रेसचं अध्यक्षपदही भूषवलं होतं.


लोकांच्या अडचणींना महत्त्व देतो, मुंबईत जाऊन माहिती घेईल, सोमय्या प्रकरणावर अजितदादांचे उत्तर
First Published on: September 19, 2021 8:29 PM
Exit mobile version