भितीदायक! ‘या’ देशात कुत्रे, मांजरी, वाघासह सिंहाला कोरोनाचा संसर्ग!

भितीदायक! ‘या’ देशात कुत्रे, मांजरी, वाघासह सिंहाला कोरोनाचा संसर्ग!

प्रातिनिधीक फोटो

जगभरात कोरोना विषाणूचा कहर सुरू असून सर्वाधिक फटका अमेरिका या देशाला बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण ४६ लाखाहून अधिक लोकांना झाली आहे तर कोरोनामुळे १ लाख ५५ हजाराहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ही परिस्थिती गंभीर असताना आता अमेरिकेतील बर्‍याच प्राण्यांनाही संसर्ग झाल्याचे उघडकीस आले आहे. अलीकडेच कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या कुत्र्याला ठार मारून टाकण्यात आले होते.


कुत्र्याला कोरोनाची लागण; संसर्ग वाढू नये म्हणून केलं ठार!

१२ कुत्रे आणि १० मांजरींना कोरोनाची लागण

अमेरिकेत आतापर्यंत १२ कुत्रे, १० मांजरींसह एक वाघ आणि एक सिंह कोविड -१९ पासून त्रस्त असल्याचे आढळून आले आहे. तर, ‘जर्मन शेफर्ड’ डॉगीला श्वासनाचा त्रास जाणवत असल्याने त्याची तपासणी केली असता त्याला कोरोना विषाणूची लागण झाल्याची पहिली घटना आहे.

अहवालानुसार स्टेटन आयलँड मधील रॉबर्ट आणि अ‍ॅलिसन माहनी यांनी ‘नॅशनल जिओग्राफिक’ ला सांगितले की, एप्रिलदरम्यान त्यांच्या ७ वर्षांच्या डॉगी ‘बडी’ ला श्वास घ्यायला त्रास होत होता आणि त्यानंतर तो कुत्रा कित्येक आठवडे कोरोनाच्या विळख्यात सापडला होता. त्यांनी असे सांगितले की, पशुवैद्यकाने मे मध्ये त्यांच्या कुत्र्याची तपासणी केली, या तपासणी दरम्यान त्याला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

अमेरिकेच्या कृषी विभागाने जूनमध्ये वृत्त दिले होते की, न्यूयॉर्कमधील ‘जर्मन शेफर्ड’ हा देशातील पहिला कुत्रा होता, ज्याला कोरोनाची लागण झाली होती. या कुत्र्याची प्रकृती अधिकच खराब झाली आणि ११ जुलै रोजी त्याला वेदनाहीन ठार करण्यात आले. या कुत्र्याच्या करण्यात आलेल्या रक्त चाचणीत रोगप्रतिकारक शक्तीच्या कर्करोगाचाही शोध लागला. मात्र कोरोना विषाणूमुळे त्याचा मृत्यू झाला असल्याचे हे समजू शकले नाही.

First Published on: July 31, 2020 12:19 PM
Exit mobile version