Joe Biden Insults Journalist: महागाईवर प्रश्न विचारताच राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पत्रकाराला केली शिवीगाळ

Joe Biden Insults Journalist: महागाईवर प्रश्न विचारताच राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पत्रकाराला केली शिवीगाळ

अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष जो बायडेन यांनी सोमवारी व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या बैठकीत पत्रकाराला शिवीगाळ केली आहे. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. फॉक्स न्यूजच्या पत्रकारने बायडेन यांना महागाईबाबत प्रश्न विचारला असता ते संतापले आणि त्यांना पत्रकाराला शिवीगाळ केली. व्हाईट हाऊसमध्ये फोटो सेशनच्या वेळी अध्यक्ष जो बायडेन यांनी फॉक्स न्यूजच्या पत्रकाराला थेट मायक्रोफोनवर ‘सन ऑफ बिच’ असं अपशब्द वापरला आहे. त्यानंतर ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

कोरोना विषाणूसोबतच महागाईचे दर वाढले

अमेरिकेत कोरोना विषाणूसोबतच महागाईचे दर वाढत आहेत. देशातील सतत वाढत असलेल्या महागाईमुळे मध्यावधी निवडणुकीत तुमच्या पक्षाचे किती नुकसान होईल, असा प्रश्न पत्रकाराने बायडेन यांना विचारला. यावर बायडेन म्हणाले की, यामुळे आमच्या पक्षाचं काहीही नुकसान होणार नाही, पण फायदा होईल असं म्हणत त्यांनी पत्रकाराला शिवीगाळ केली. त्यानंतर पत्रकार ड्यूसीने फॉक्स न्यूजच्या दुसऱ्या रिपोर्टर सांगितलं की, इतर पत्रकारांना ही घटना सांगावी लागेल. कारण लोकांच्या आवाजामुळे त्यांना काहीही ऐकू येत नव्हते.

सोशल मीडियावर नेटकरी संतापले

राष्ट्रध्यक्ष जो बायडेन यांच्या या वक्तव्यानंतर अमेरिकन मीडियामध्ये एकच खळबळ उडाली. तसेच त्यांना यासाठी माफी मागावी लागू शकते. परंतु व्हाईट हाऊसने अद्यापही याबाबत काहीही सांगितलेलं नाहीये. मात्र, हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. एका राष्ट्रपतींनी अपशब्द वापरणे हे त्यांच्यासाठी शोभनीय नाहीये असं म्हणत त्यांच्यावर टीका केली आहे.


हेही वाचा : T20 World Cup 2022 : टी-२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान पुन्हा टीम इंडियाचा पराभव करणार, शोएब अख्तरचं भाकित


 

First Published on: January 25, 2022 11:44 AM
Exit mobile version