अमेरिका फायझर, मॉडर्नाची लस पाठवण्यास तयार, मात्र भारताने यामुळे दिला नकार

अमेरिका फायझर, मॉडर्नाची लस पाठवण्यास तयार, मात्र भारताने यामुळे दिला नकार

अमेरिका फायझर, मॉडर्नाची लस पाठवण्यास तयार, मात्र भारताने यामुळे दिला नकार

काही दिवसांपूर्वी अमेरिकेन जगभरात कोरोना लस वाटप करण्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर अमेरिकेने काही देशांना लस वाटण्यास सुरुवात केली आहे. अमेरिका भारताला देखील लस देण्यास तयार झाली आहे. मात्र भारतामध्ये काही कायदेशीर अडथळे येत आहेत. त्यामुळे सध्या अमेरिका भारताकडून हिरवा कंदील मिळण्यासाठी वाट पाहत आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते एडवर्ड प्राइस म्हणाले की, भारताकडून होकार आल्यानंतर आम्ही लस वेगाने पाठवण्यास तयार आहोत.

भारताने कार्यवाही, नियामक आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अधिक वेळ मागितला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, एडवर्ड प्राइस म्हणाले की, अमेरिकेची लस पाकिस्तान, नेपाळ, भूतान आणि बांग्लादेशपर्यंत पोहोचली आहे. परंतु भारतापर्यंत पोहोचण्यास अडचण निर्माण होत आहे. भारतात लस पोहोचण्यासाठी वेळ लागत आहे. कारण आपात्कालीन आयातीमध्ये काही कायदेशीर अडथळे येत आहेत.

माहितीनुसार, भारताला अमेरिकेकडून मॉडर्ना आणि फायझरचे ३० ते ४० लाख डोस मिळण्याची शक्यता आहे. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI)ची मॉडर्ना लसीला मान्यता मिळाली आहे. परंतु फायझरने आतापर्यंत भारतामध्ये आपात्कालीन वापरासाठी अर्ज केला नाही आहे. महत्त्वाचे म्हणजे मॉडर्ना आणि फायझरला भारतात कायदेशीर संरक्षण हवे आहे. जे त्यांना देशांतील कायदेशीर प्रकरणांपासून संरक्षण देईल. त्यामुळे अमेरिका भारत सरकारकडून मंजूरी मिळण्याची वाट पाहत आहे.


हेही वाचा – लस घेतल्यानंतर कोरोनाची लक्षणे; पहिला व दुसरा डोस घेतलेल्यांसाठी WHO च्या सूचना


First Published on: July 14, 2021 11:13 AM
Exit mobile version