US troops exit: अमेरिकेने तालिबान्यांना दाखवला इंगा

US troops exit: अमेरिकेने तालिबान्यांना दाखवला इंगा

US troops exit: अमेरिकेने तालिबान्यांना दाखवला इंगा

तालिबानची डेडलाईन संपण्याच्या पूर्वीच २४ तासांअगोदर अमेरिकन सैनिकांनी अफगाणिस्तान सोडले. तालिबानने रेस्क्यू ऑपरेशन करणाऱ्या देशांना आपले सैन्य परतण्यासाठी ३१ ऑगस्ट म्हणजेच आजची डेडलाईन दिली होती. पण अर्ध्या रात्री अमेरिकेने आपल्या सैनिकांना अफगाणिस्तानातून परत बोलवण्याचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानला आहे त्या परिस्थितीत सोडून अमेरिकेने आपले हात मागे घेतले. परंतु अफगाणिस्तानमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे जगभरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. पण अमेरिकेने अफगाणिस्तानातून परताना तालिबान्यांना चांगलाच इंगा दाखवला आहे.

अमेरिकन सैन्य मायदेशी परतले असून यापूर्वी त्यांनी अफगाणिस्तानामधील तैनात असलेली विमाने वापरण्या योग्य ठेवली नाही आहेत. हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अशी तीन विमाने ठेवण्यात आली आहे, जी कधीही उडू शकणार नाहीत. याशिवाय अफगाणिस्तानमध्ये असलेले रॉकेट डिफेंट सिस्टमसुद्धा अमेरिकन सैनिकांनी नष्ट केले आहे. आता याचा वापर केला जाऊ शकणार नाही आहे. तसेच शस्त्रांनी सज्ज असलेल्या गाड्यांचे नुकसान देखील केले आहे.

माहितीनुसार, अमेरिकाने जी शस्त्रे अफगाणिस्तानमध्ये सोडली आहेत, त्या शस्त्रांचे देखील नुकसान केले आहे. याशिवाय तज्ज्ञांनी म्हटले आहे की, अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये जी शस्त्रे तैनात केली होती, ती सर्व शस्त्रे देशांतर्गत परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी वापरली जाणारे शस्त्रे आहेत. म्हणजेच या शस्त्रांनी तालिबान इतर कोणत्याही देशाला हानी पोहोचवू शकत नाही.


हेही वाचा – Afghanistan Crisis: ‘अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याची माघार हा जगासाठी एक महत्त्वाचा संदेश’


 

First Published on: August 31, 2021 6:54 PM
Exit mobile version