अमेरिकेतील अलास्कात दोन विमानांची टक्कर; ५ जणांचा मृत्यू, १० जण जखमी

अमेरिकेतील अलास्कात दोन विमानांची टक्कर; ५ जणांचा मृत्यू, १० जण जखमी

अमेरिकेतील अलास्कात दोन विमानांची टक्कर

अमेरिकेतील अलास्कात येथे दोन विमानांची टक्कर झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून दहा जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. तर या दुर्घटनेत एक जण बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात युएसए टूडेने दिलेल्या वृत्तानुसार अग्नेय अलास्कामधील केटचिकान या शहरात हा अपघात झाला आहे. दोन विमानाची हवेत टक्कर झाल्याने ही घटना घडल्याचे वृत्त समोर आले आहे. सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र, हा अपघात नेमका कशामुळे झाला याबद्द्ल अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. ही दोन्ही विमाने पाण्यावर उडणारी असून प्रवाशांना घेऊन जाताना हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

First Published on: May 14, 2019 10:39 PM
Exit mobile version