योगी सरकारच्या यूपीतील मदरशांच्या सर्वेक्षणाचे निर्णय म्हणजे ‘एनआरसीच’; ओवैसींचा गंभीर आरोप

योगी सरकारच्या यूपीतील मदरशांच्या सर्वेक्षणाचे निर्णय म्हणजे ‘एनआरसीच’; ओवैसींचा गंभीर आरोप

उत्तर प्रदेशात मान्यता नसलेल्या मदरशांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश योगी सरकारने दिले आहेत. योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानंतर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी गंभीर आरोप केला आहे. योगी आदित्य यांच्या सर्व्हेचे आदेश म्हणजे हे सर्व्हे नसून छोटा एनआरसीच असल्याचा आरोप ओवैसी यांनी केला आहे. याबाबत ओवैसी यांनी ट्विट करत टीका केली आहे. (uttar pradesh the order of the yogi government is not the survey but the nrc aimim asaduddin owaisi allegation)

“राज्यातील सर्व मदराशे हे घटनेच्या परिच्छेद 30 मध्ये आम्हाला मिळालेल्या घटनात्मक अधिकारात आहेत, असे असतानाही सरकारने हा आदेश का जारी केला? तसेच, हे सर्वेक्षण नसून, एनआरसीच आहे. घटनात्मक अधिकारात सरकार ढवळाढवळ करू शकत नाही. मुस्लिमांचा छळ करण्याचा सरकारचा हा प्रयत्न आहे”, अशा शब्दांत ओवैसी यांनी ट्विट करत योगी सरकारवर टीका केली आहे.


हेही वाचा – मुंबादेवी परिसरात बॅनर लावण्यावरून मनसे कार्यकर्त्यांची महिलेला मारहाण, व्हिडीओ व्हायरल

First Published on: September 1, 2022 7:41 PM
Exit mobile version