Edava Basheer Dies : पार्श्वगायक एदवा बशीर यांचे लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान निधन

Edava Basheer Dies : पार्श्वगायक एदवा बशीर यांचे लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान निधन

प्रख्यात मल्याळी पार्श्वगायक एदवा बशीर (Edava Basheer) यांचे लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान निधन झाले आहे. वयाच्या ७८ व्या वर्षी एदवा बशीर यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाबद्दल दिग्गजांसह चाहत्यांकडून शोक व्यक्त केला जात आहे.

नेमकं काय घडलं?

एदवा बशीर हे ब्ल्यू डायमंड ऑर्केस्ट्रामध्ये गाणी सादर करत होते. शनिवारी केरळातील कोलम जिल्ह्यातील पाथिरापल्लीमध्ये ऑर्केस्ट्राचा शो होता. केरळात लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान ‘माना हो तुम बेहद हसीन’ हे हिंदी गाणं सादर करत असतानाच एदवा बशीर व्यासपीठावर कोसळले. त्यानंतर लगेचच त्यांना चेरथाला येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

एदवा बशीर म्हणजे संगीत विश्वातील एक मोठं नाव

शालेय जीवनापासूनच एदवा बशीर यांनी मल्ल्याळम संगीत विश्वात नाव कमावलं होतं. त्यांनी अनेक पुरस्कारही पटकावले आहेत. संगीतालय नावाचा म्युझिक ग्रुप सुरु केल्यानंतर ते प्रकाशझोतात आले. मल्ल्याळम संगीत विश्वातील एदवा बशीर हे एक मोठे नाव आहे. त्यांनी मल्याळम सिनेमांसाठी अनेक गाणी गायली आहेत. बशीर यांनी अनेक पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं आहे. त्यांचे अन्नपूर्णेश्वरी हे गाणं खूप लोकप्रिय झालं होतं.

केरळच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक

केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि विरोधी पक्षनेते व्ही.डी. सतीशन यांनी एदवा बशीर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. तसेच पार्श्वगायिका के. एस चित्रा यांनीही श्रद्धांजली वाहिली आहे.


हेही वाचा : FD Rules Changed: रिझर्व्ह बँकेकडून एफडीच्या नियमात मोठे बदल, नवे नियम लागू; जाणून घ्या


 

First Published on: May 29, 2022 8:16 PM
Exit mobile version