FD Rules Changed: रिझर्व्ह बँकेकडून एफडीच्या नियमात मोठे बदल, नवे नियम लागू; जाणून घ्या

जर तुम्ही आपले पैसे एफडी (FD Rules Changed) करून ठेवत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कारण रिझर्व्ह बँकेकडून एफडीच्या नियमात मोठे बदल करण्यात आले आहेत. तसेच नवे नियम (New Rules) सुद्धा लागू करण्यात आले आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक सरकारी आणि बिगरसरकारी बँकांनी एफडीवरील व्याजदर वाढवले आहेत. त्यामुळे एफडी करून ठेवण्यापू्र्वी नियम समजून घेणं खूप गरजेचे आहे. कारण जर एफडीचे नियम तुम्हाला माहिती नसतील तर तुम्हाला मोठ्या नुकसानाची सामना करावा लागू शकतो.

एफडीच्या नियमात मोठे बदल

यामध्ये बदल करण्यात आलेल्या नियमानुसार, जर मॅच्युरिटी पूर्ण झाल्यानंतर तुम्ही रकमेबाबत क्लेम केला नाही तर तुम्हाला त्यावर कमी व्याज मिळू शकतो. हे व्याज सेव्हिंग अकाऊंटवर मिळणाऱ्या व्याजाइतकेच असणार आहे. सध्या बँकेकडून पाच ते दहा वर्षांच्या दीर्घकालीन एफडीवर पाच टक्क्यांहून अधिक व्याज देतात. मात्र, सेव्हिंग अकाऊंटरील व्याजदर हे तीन ते चार टक्क्ये इतके आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जर फिक्स डिपॉझिट मॅच्युअर झाले आणि रकमेचा भरणा होऊ शकला नाही किंवा या रकमेवर दावा केला गेला नाही, तर त्यावर व्याजदर हा सेव्हिंग अकाऊंटच्या हिशोबाने किंवा मॅच्युअर एफडीवर निर्धारीत व्याजदर यापैकी जे काही असेल ते दिले जाणार आहे.

जर तुम्ही पाच वर्षांसाठी मॅच्युरिटी असलेली एफडी घेतली असेल तर ती आज मॅच्युअर झालेली असेल. मात्र तुम्ही ही रक्कम काढली नाही तर दोन शक्यता निर्माण होण्याची शक्यता आहे. पहिलं म्हणजे जर एफडीवर मिळत असलेले व्याज सेव्हिंग अकाऊंटवर मिळत असलेल्या व्याजापेक्षा कमी असेल तर तुम्हाला एफडीवरील व्याजच मिळू शकतो. परंतु जर तुम्हाला एफडीवर व्याज मिळत असेल तर हे व्याज सेव्हिंग अकाऊंटवर मिळत असलेल्या व्याजापेक्षा अधिक असेल तर तुम्हाला सेव्हिंग अकाऊंटवर मिळणारे व्याज हे मॅच्युरिटीनंतर मिळू शकते.

एफडीचे जुने नियम काय?

जुन्या नियमानुसार, जर तुमची एफडी मॅच्युअर झाली आणि त्यातून पैसे काढले नाहीत तर बँक तुमच्या एफडीची मुदत वाढवायची. परंतु रिझर्व्ह बँकेने काढलेल्या नव्या नियमानुसार आता तसं होणार नाहीये.


हेही वाचा : Fix Deposit: एफडीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी जाणून घ्या विविध बँकेचे व्याजदर