कुख्यात डाकू वीरप्पनच्या मुलीचा भाजपमध्ये प्रवेश

कुख्यात डाकू वीरप्पनच्या मुलीचा भाजपमध्ये प्रवेश

कुख्यात डाकू वीरप्पनच्या मुलीचा भाजपात प्रवेश

तामिळनाडू राज्यातील कुप्रसिद्ध चंदन तस्कर वीरप्पन हा आपल्या क्रुरतेसाठी प्रसिद्ध होता. त्याच्या अनेक भयानक कृत्यांपैकी एक गाजलेला किस्सा म्हणजे वीरप्पनने पी. श्रीनिवास नावाच्या अधिकाऱ्याचे मुंडके कापून आपल्या साथीदारांसोबत त्याने फूटबॅाल खेळल्याचे बोलले जाते. आता याच वीरप्पनची मुलगी विद्याराणी हिने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. तामिळनाडूतल्या कृष्णनगर येथे भाजपतर्फे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याचदरम्यान पक्षाचे सरचिटणीस मुरलीधर राव आणि माजी केंद्रीय मंत्री पोन राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत विद्याराणीने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. विषेश म्हणजे या दिवशी विद्याराणी यांच्यासह विविध राजकीय पक्षांतील तब्बल १००० सभासदांनी भाजपमध्ये प्रवेश केला.  “मला गरीब आणि वंचितांसाठी त्यांची जात आणि धर्म विचारात न घेता काम करायचे आहे. पंतप्रधान मोदींच्या योजना लोकांसाठी आहेत आणि मला ते लोकांपर्यंत पोहोचवायचे आहे,” असे विद्याराणी म्हणाली.

वडीलांचा मार्ग चुकीचा होता पण…

वडीलांचा मार्ग चुकीचा होता पण… पक्षाचे महासचिव मुरलीधर राव याच्याकडून ओळखपत्र मिळाल्यानंतर त्या म्हणाल्या की, ”मी गरजवंतांसाठी काम करेन, माझ्या वडीलांचा मार्ग चुकीचा होता. पण त्यांनी नेहमीच गरीबांचा विचार केला”. विद्याराणी पेशाने वकील असून आता त्यांची राजकीय वाटचाल कशी असेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

First Published on: February 23, 2020 4:43 PM
Exit mobile version