सेहवागच्या पत्नीची बिझनेस पार्टनरकडून फसवणूक

सेहवागच्या पत्नीची बिझनेस पार्टनरकडून फसवणूक

विरेंद्र सेहवाग कुटूंबासोबत

भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागची पत्नी आरती सेहवागला बिझनेस पार्टनर्सनी फसविल्याचा आरोप आरतीने केला आहे. कंपनीतील पार्टनर्सनी खोट्या स्वाक्षऱ्या करून ४.५ कोटींचं कर्ज घेतल्याचा आरोप करत आरतीने पोलीस स्थानकात धाव घेतली. याप्रकरणी ७ जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी कलम ४२० अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

हेही वाचा – लोकशाहीचे मंदिर असलेल्या संसद भवनात कचऱ्याचे साम्राज्य?

दिल्लीच्या अशोक विहार येथे रोहित कक्कर नावाच्या एका व्यक्तीच्या फर्ममध्ये आरतीने पार्टनर होती. वीरेंद्र सेहवागच्या नावाचा वापर करून करोडो रूपयांचं कर्ज काढण्यात आल्याचा आरोप रोहित आणि त्याच्या सहकाऱ्यांवर आरतीने केला आहे. आपल्या तक्रारीत आरतीने कोणतीही परवानगी न घेता आपल्या नावाचा गैरफायदा उठवत या ७ जणांनी हा व्यवहार केल्याचे आरतीने म्हटले आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी कलम ४२० अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी कलम ४२० अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

First Published on: July 13, 2019 2:04 PM
Exit mobile version