कोण आहे हस्बुल्ला मागोडोव्ह?हा ‘मिनी खबीब’ होतोय सोशल मीडियावर व्हायरल

कोण आहे हस्बुल्ला मागोडोव्ह?हा ‘मिनी खबीब’ होतोय सोशल मीडियावर व्हायरल

कोण आहे हस्बुल्ला मागोडोव्ह?हा 'मिनी खबीब' होतोय सोशल मीडियावर व्हायरल

सोशल मीडियावर दररोज सर्रास गोष्टी व्हायरल होत असतात. एखादा सामान्य माणूस देखील वार्‍याच्या वेगाने इंटरनेट वर कोणत्याही क्षणी प्रसिद्ध होऊ शकतो. सध्या सोशल मीडियावर हस्बुल्ला मागोडोव्ह याच्या लढाईचा व्हिडिओ तूफान व्हयल होत आहे. तुम्ही सोशल मीडियावर सक्रिय असाल तर तुम्हाला याची माहिती नक्कीच असेल तुम्ही कदाचित त्याला पाहून गोंधळून गेला असाल दिसायला जरी लहान असला तरी त्याचे वय 18 वर्षे आहे. तरी अनेकांना असा प्रश्न पडला असेन हा व्यक्ती नेमका आहे तरी कोण ? आपण हस्बुल्ला मागोडोव्ह जाणून घेऊया हस्बुल्ला मागोडोव्ह हा एक ब्लॉगर असून तो रशियामध्ये राहतो तसेच मागोडोव्ह सध्या गंभीर आजाराने ग्रस्त असल्यामुळे त्याची शारीरिक वाढ पूर्ण होऊ शकली नाही. एका वृत्तानुसार त्याच्यात GHD(Growth Hormone Deficiency), म्हणजेच वाढ संप्रेरकची कमतरता आहे.

त्याला बौनेपणा असेही म्हणतात. तसेच तो 3 फूट आणि 3.37 इंच उंचीचा आहे आणि त्याचे वजन सुमारे 16 किलो आहे. काही दिवसांपूर्वी हस्बुल्ला मागोडोव्ह याचा ‘मंजूर’ फाईटची बातमी व्हायरल झाली होती आणि या लढाईने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. दरम्यान या लढाईने खूप वाद निर्माण झाला होता. रशियाच्या बौनो अॅथलेटिक असोसिएशनने (Russia’s Dwarf Athletic Association) हे अधिकृत नाही असे घोषित केले होते. आणि याबद्दल निषेध देखील विकत केला होता. हस्बुल्ला मागोडोव्ह याला मिनी खबीब म्हणून देखील संबोधले जाते. त्याचे अनेक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर पसंत केले जात आहेत.


हे हि वाचा – vaccine: लहान मुलांसाठी Zydus Cadilla ने तयार केली लस, लवकरच वापरात येण्याची शक्यता

First Published on: June 7, 2021 7:33 PM
Exit mobile version