भारताच्या राष्ट्रपतींचा शपथविधी २५ जुलैलाच का होतो? काय आहे कारण ?

भारताच्या राष्ट्रपतींचा शपथविधी २५ जुलैलाच का होतो? काय आहे कारण ?

भारताचे मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ संपून द्रौपदी मुर्मू(draupadi murmu) ह्या भारताच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती म्ह्णून आज २५ जुलै २०२२ रोजी शपथ घेणार आहेत. भारताच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून म्हणून द्रौपदी मुर्मू यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. पण भारताच्या राष्ट्रपतींचा शपथविधी सोहळा हा २५ जुलै रोजीच का आयोजित केला जातो? त्याचे नेमके कारण काय हे जाणून घेऊ.

हे ही वाचा – द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपतीपदी होणार विराजमान, शपथविधीची जय्यत तयारी

आजचा २५ जुलै हा दिवस भारतासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो आणि त्याचं कारण असं की, आजच्याच २५ जुलैच्या दिवशी दर पाच वर्षांनी भारताला नवे राष्ट्रपती मिळतात. आज २५ जुलै रोजी भारताच्या १५ व्या नवनिर्वाचित राष्ट्रपती म्ह्णून द्रौपदी मुर्मू पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रपती पदासाठीची निवडणूक पार पडली होती. त्यावेळी आपले प्रतिस्पर्धी यशवंत सिन्हा(yashwant sinha) यांचा मोठ्या फरकाने मुर्मू यांनी पराभव केला. देशाच्या सर्वोच्च पदी म्हणजेच राष्ट्रपतीपदी विराजमान होणाऱ्या द्रौपदी मुर्मू(draupadi murmu) या पहिल्या आदिवासी महिला आहेत. आजच्या दिवसाच्या इतिहासाबद्दल बोलायचं झालं तर २५ जुलैला अनेक राष्ट्रपतींनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली आहे आणि अशातच भारताच्या इतिहासात २५ जुलै ही तारीख प्रामुख्याने राष्ट्रपतींच्या शपथविधीसाठी ओळखली जाते.

हे ही वाचा – जम्मू-काश्मीरमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका, राजनाथ सिंहांच्या भाजपच्या कार्यकर्त्यांना तयारीच्या सूचना

राष्ट्रपती पद म्हणजेच देशातील सर्वोच्च पद आणि राष्टपती(president of india) म्हणजेच देशाचे पहिले नागरिक म्हणून ओळखले जातात. भारताच्या इतिसात अनेक राष्ट्रपतींनी २५ जुलै रोजी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली आहे. आजतागायत कोणत्या राष्ट्रपतींनी २५ जुलै रोजी शपथ घेतली तेही जाणून घेऊ.

– नीलम संजीव रेड्डी (Neelam Sanjiva Reddy) (25 जुलै 1977 ते 25 जुलै 1982)

– ज्ञानी जैल सिंह (Giani Zail Singh) (25 जुलै 1982 ते 25 जुलै 1987)

– रामास्वामी वेंकटरमन (Ramaswamy Venkataraman) (25 जुलै 1987 ते 25 जुलै 1992)

– शंकरदयाल शर्मा (Shankar Dayal Sharma) (25 जुलै 1992 ते 25 जुलै 1997)

– केआर नारायनन (K. R. Narayanan) (25 जुलै 1997 ते 25 जुलै 2002)

– एपीजे अब्दुल कलाम (A. P. J. Abdul Kalam) (25 जुलै 2002 ते 25 जुलै 2007)

– प्रतिभा पाटिल (Pratibha Patil) (25 जुलै 2007 ते 25 जुलै 2012)

– प्रणब मुखर्जी (Pranab Mukherjee) (25 जुलै 2012 ते 25 जुलै 2017)

– रामनाथ कोविंद (Ram Nath Kovind) (25 जुलै 2017 ते 25 जुलै 2022)

हे ही वाचा – लोकांकडून भरपूर प्रेम मिळालं, राष्ट्रपती रामनाथ कोविंद शेवटच्या भाषणात भावूक

First Published on: July 25, 2022 9:28 AM
Exit mobile version