दिराकडून बलात्कार, नवऱ्याकडून ‘तलाक’

दिराकडून बलात्कार, नवऱ्याकडून ‘तलाक’

दिराकडून बलात्कार झाला आणि नवऱ्यानं तलाक दिला. ही कर्मकहाणी आहे उत्तरप्रदेशातल्या मुझ्झफरनगरमधील एका महिलेची. ती ओरडत होती, त्या नराधमासमोर याचना करत होती, इज्जतीची भीक मागत होती. पण अंगात हैवान संचारलेल्या दिराला मात्र थोडी देखील दया आली नाही. अखेर या नराधमानं आईसमान आपल्या भावजयवर बलात्कार केला. यानंतर पीडित महिलेचं सारं आयुष्य उद्धवस्त झालं. दिरानं बलात्कार केला तर नवऱ्यानं तलाक दिला. दिल्लीतील मस्जिदमध्ये इमाम म्हणून असलेल्या पीडित महिलेच्या पतीला आपल्या पत्नीवर आपल्याच भावाकडून बलात्कार झाल्याची घटना समजली. पण, याचा जाब विचारण्याऐवजी या इमामानंच आपल्या पत्नीला तलाक दिला. बलात्कार करताना या महिलेला नराधम दिरानं बेदम मारहाण देखील केली. ज्यावेळी घटना घडली तेव्हा पीडितेचा पत्नी घरात नव्हता. पीडित एकटी असल्याचं पाहून आसुसलेल्या या हैवान दिरानं आपला डाव साधवला. पण त्यानंतर नवऱ्यानं देखील साथ सोडल्यानं जगण्याचा प्रश्न या महिलेपुढे उभा ठाकला आहे. सध्या पीडित महिलेची वैद्यकीय चाचणी करण्यात येत आहे.

वाचा – तिहेरी तलाकच्या अध्यादेशाला कॅबिनेटची मंजूरी

सुखी संसारावर हैवानाची नजर

मागील वर्षी पीडितेचं लग्न झालं होतं. पण, या संसाराला दिराचीच नजर लागली. भाऊ घरात नाही हे पाहून नराधमानं आपला डाव साधला आणि पीडितेच्या अब्रुवर घाला घातला. यावेळी पीडितेनं झोळी पसरून दिरासमोर आपल्या अब्रुची भीक देखील मागितली. याचना देखील केली. पण, अंगात हैवान संचारलेल्या दिरानं मात्र आपला डाव साधला. याठिकाणीच या महिलेचे भोग संपले नाहीत तर नवऱ्यानं देखील पीडितेला तलाक दिला. सध्या आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाचा – ट्रिपल तलाक आणि निकाह हलालावर होणार कठोर कायदा

First Published on: October 29, 2018 3:27 PM
Exit mobile version