राहुल गांधींना महिला आयोगाची नोटीस

राहुल गांधींना महिला आयोगाची नोटीस

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी

काँग्रसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना महिला आयोगानं आता नोटीस पाठवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरले असून आपल्या बचावासाठी त्यांनी महिला मंत्र्याला पुढे केलं आहे. अशा शब्दात राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला होता. राजस्थानमधील एका सभेत त्यांनी ही टीका केली होती. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी नाराजी व्यक्त केली होती. शिवाय, राहुल गांधी यांचं विधान हे अपमानजनक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटलं होतं. त्यावर आता महिला आयोगानं राहुल गांधी यांचं वक्तव्य पुरुषप्रधान मानसिकतेतून केल्याचं म्हटलं आहे. राहुल गांधी महिलांना कमकुवत मानतात का? असा सवाल करत महिला आयोगानं राहुल गांधी यांना नोटीस देखील पाठवली आहे. यामध्ये महिला आयोगानं या वक्तव्यामागचा उद्देश काय? असा सवाल देखील केला आहे.


 राफेल करार आणि कणकंदन

सध्या संसदेमध्ये राफेल करार गाजत आहे. राहुल गांधी पंतप्रधान मोदींना लक्ष्य करताना दिसत आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान देखील राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्ला केला होता. शिवाय, अनेक प्रश्न देखील उपस्थित केले. त्यावर संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी राहुल गांधी यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देखील दिले. यानंतर राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करताना नरेंद्र मोदी चर्चेपासून पळ काढत असल्याचा आरोप केला. शिवाय, राजस्थानमधील एका सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरले असून आपल्या बचावासाठी त्यांनी महिला मंत्र्याला पुढे केलं आहे. अशी टीका देखील केली होती. त्यावर आता महिला आयोगानं राहुल गांधी यांना नोटीस पाठवली आहे.

वाचा – मोदीजी महिलांचा सन्मान घरातून होतो; राहुल गांधींचा टोला

First Published on: January 10, 2019 2:22 PM
Exit mobile version