घरदेश-विदेशमोदीजी महिलांचा सन्मान घरातून होतो; राहुल गांधींचा टोला

मोदीजी महिलांचा सन्मान घरातून होतो; राहुल गांधींचा टोला

Subscribe

मोदीजी महिलांचा सन्मान आपल्या घरातून होतो असं ट्विट करत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला हाणला आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये अद्यापही वाक् युद्ध सुरूच आहे. यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. काँग्रेसमध्ये महिलांचा अपमान होत असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. त्याला आता काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रत्त्युत्तर दिलं आहे. मोदीजी महिलांचा सन्मान आपल्या घरातून होतो असं ट्विट करत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला हाणला आहे. मोदीजी मी तुमचा आदर ठेवत सांगतो, आपल्या संस्कृतीत महिलांचा सन्मान घरातून सुरू होतो. विषय भरकटवू नका. माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या !! मुळ राफेल करारामध्ये बदल केल्यानंतर वायुसेना आणि संरक्षण मंत्रालयाने आक्षेप घेतला होता का? केवळ हो किंवा नाही एवढंच उत्तर द्या. असा सवाल राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला आहे.

दरम्यान यानंतर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि स्मृती इराणी यांनी देखील यावेळी राहुल गांधी यांच्या ट्विटरला उत्तर दिलं आहे.

- Advertisement -

राफेल करारावरून सध्या काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार आरोप – प्रत्यारोप सुरू आहेत. राफेलमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. संसदेतील ही लढाई आता जाहीर सभांमध्ये देखील पाहायाला मिळत आहे. दरम्यान, अनिल अंबानी यांना देखील कंत्राट मिळाल्यावरून काँग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं आहे.

वाचा – राफेल करारावर पंतप्रधानांनी बोलावं – राहुल गांधी

वाचा – राफेलबाबत धक्कादायक माहिती समोर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -