coronavirus new variant: नव्या व्हेरियंटला ‘भारतीय’ म्हटल्यानंतर केंद्राचा आक्षेप; म्हणाले WHO संदर्भातील ते वृत्त खोटे

coronavirus new variant: नव्या व्हेरियंटला ‘भारतीय’ म्हटल्यानंतर केंद्राचा आक्षेप; म्हणाले WHO संदर्भातील ते वृत्त खोटे

जगातील ४४ देशांमध्ये भारताचा कोरोना व्हेरियंट आढळला असल्याचा दावा जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) केला होता. भारताच्या कोरोना व्हेरियंटबद्दल WHOने चिंता व्यक्त केली असे वृत्त सर्व माध्यमांनी प्रसारित केले. त्यानंतर भारत सरकारने WHOचा हा दावा फेटाळून लावला आहे. याबाबतच्या वृत्तावर केंद्र सरकारने आक्षेप घेत, WHOने या व्हेरियंटला ‘भारतीय व्हेरियंट’ असा उल्लेख केला नसल्याचे सांगितले आहे.

केंद्र सरकारने सांगितले की, ‘जागतिक आरोग्य संघटनेने B.1.617 जागतिक चिंतेचा एक प्रकार म्हणून वर्गीकरण केले आहे. परंतु बऱ्याच माध्यमांनी या व्हेरियंटला ‘भारतीय व्हेरियंट’ म्हटले आहे, जे पूर्णपणे खोटे आहे आणि कोणत्याही पाठपुरव्याशिवाय देण्यात आले आहे.’ पुढे केंद्राने सांगितले की, ‘WHOने आपल्या ३२ पानांच्या दस्तऐवजात डबल म्यूटंट स्ट्रेन म्हणजे कोरोना व्हायरसचा B.1.617 प्रकाराला ‘भारतीय व्हेरियंट’ असे वर्णन केले नाही आहे. तसेच या संदर्भातील अहवालात ‘भारतीय’ हा शब्द वापरला गेला नाही आहे.’

माहितीनुसार भारतात सध्या ज्या व्हेरियंटचा कहर दिसत आहे, तो ब्रिटन, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकाच्या व्हेरियंटनंतर चौथा प्रकार मानला जातो. कोरोना व्हायरसला डबल म्यूटंटच्या नावाने ओळखले जाते, जो शरीरातील अँटीबॉडीत नष्ट करतो. डबल म्यूटंट पहिल्यांदा ५ ऑक्टोबर २०२०मध्ये आढळला होता, त्यावेळेस भारतातमध्ये कोरोनाचा कहर इतका नव्हता.


हेही वाचा – Coronavirus: जगातील ४४ देशांमध्ये सापडला भारतामधील कोरोना व्हेरियंट – WHO


 

First Published on: May 12, 2021 3:29 PM
Exit mobile version