Wrestlers Throw Medals In Ganges : आंदोलक कुस्तीपटू आक्रमक; गंगेत विसर्जित करणार मेडल

Wrestlers Throw Medals In Ganges : आंदोलक कुस्तीपटू आक्रमक; गंगेत विसर्जित करणार मेडल

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी संसदेच्या नवीन वास्तूचे उद्घाटन केले. त्याचवेळी दिल्लीमध्ये धरणे आंदोलन करत असलेल्या कुस्तीपटू मुली आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. पैलवानांनी बॅरिकेड्स तोडून नवीन संसदेकडे जाण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता पोलीस आणि कुस्तीपटूंमध्ये झटापट झाली. पोलिसांनी कुस्तीमध्ये भारताला मेडल पटकावून देणाऱ्या कुस्ती विनेश फोगाट, संगीता फोगाट, साक्षी मलिक, बजरंग पुनिया यांच्यासह अनेकांना ताब्यात घेतले आहे. यानंतर आता कुस्तीपटुंनी आक्रमक भूमिका हाती घेतली आहे. त्यानुसार, आंदोलक कुस्तीपटू हे त्यांनी कमावलेलं मेडल गंगेमध्ये विसर्जित करणार आहेत. शिवाय उद्यापासून आंदोलनाची वेगळी दिशा असणार आहे. (Wrestlers Throw Medals In Ganga River Haridwar Today Brij Bhushan Sharan Singh)

दिल्लीतल्या जंतरमंतरवर २३ एप्रिलपासून कुस्तीपटूंचे धरणे आंदोलन सुरु आहे. कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपा नेते ब्रिजभूषण शरण सिंह यांना अटक करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, या मागणीवर कुस्तीपटू आंदोलक ठाम आहेत. मात्र परवा संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनावेळी आंदोलकांवर पोलिसांनी कारवाई केली आणि पोलिसी बळावर आंदोलन संपवलं.

हेही वाचा – महिला कुस्तीपटूंचे आंदोलन पोलिसांनी चिरडले, संसद लोकार्पण सोहळ्यावेळी दिल्लीत राडा

मिळालेल्या माहितीनुसार, आज आंदोलकांनी एक भूमिका जाहीर केली असून देशासाठी मिळवलेले मेडल ते गंगेमध्ये विसर्जित करणार आहेत. केंद्र सरकाराचा निषेध म्हणून आणि ब्रिजभूषण यांच्यावर कारवाईसाठी दबाव निर्माण करण्यासाठी पैलवान हे पाऊल उचलत आहेत. त्यानुसार, हरिद्वार येथे आज संध्याकाळी ६ वाजता मेडल गंगेमध्ये विसर्जित करण्यात येणार आहे. विघ्नेश फोगाट यांनी ही माहिती दिली. तसेच उद्यापासून इंडिया गेटवर आंदोलक पैलवान उपोषणाला बसणार आहेत.

जंतर-मंतरवर सुरू असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलंनाविरोधात रविवारी पोलिसांनी कडक कारवाई केली. दिल्ली पोलिसांनी जंतरमंतरहून नवीन संसद भवनाकडे कूच करणाऱ्या कुस्तीपटूंना ताब्यात घेतले. दिल्ली पोलिसांनी जंतरमंतरवरील कुस्तीपटूंचा तंबूही हटवला. आंदोलकांवर एफआयआर दाखल करण्यात आलेला आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम १४७, १४९, १८६, १८८, ३३२, ३५३, पीडीपीपी कायद्याच्या कलम ३ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला.


हेही वाचा – Wrestlers Protest : भारताची मान गौरवाने उंचावणाऱ्या खेळाडूंसोबत… आदित्य ठाकरेंची टीका

First Published on: May 30, 2023 1:57 PM
Exit mobile version