घरक्रीडाWrestlers Protest : भारताची मान उंचावणाऱ्या खेळाडूंसोबत... आदित्य ठाकरेंची टीका

Wrestlers Protest : भारताची मान उंचावणाऱ्या खेळाडूंसोबत… आदित्य ठाकरेंची टीका

Subscribe

मुंबई : रविवारी एकीकडे संसदेच्या नवीन वास्तूचे (new Parliament building) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या (PM Narendra Modi) हस्ते उद्घाटन होत असताना दुसरीकडे दिल्लीत धरणे आंदोलन करत असलेल्या पैलवान मुली (Wrestlers Protest) आणि पोलिसांमध्ये मोठी धुमश्चक्री झाली होती. त्यावरून महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena UBT) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी टीका केली आहे. खेळाच्या माध्यमातून जगभरात भारताची मान गौरवाने उंचावणाऱ्या खेळाडूंसोबत रविवारी दिल्लीत जे घडले ते नींदनीय आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – Wrestlers Protest : ‘आज आपली लोकशाही मूल्ये अपमानित झाली…’, शरद पवारांची दिल्ली पोलिसांवर नाराजी

- Advertisement -

भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. बृजभूषण सिंह यांच्यावर तत्काळ कारवाई करावी, यासाठी कित्येक दिवसांपासून भारताच्या महिला कुस्तीपटूंचे जंतर-मंतर (Jantar Mantar) येथे धरणे आंदोलन सुरू आहे. रविवारी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नव्या संसद भवनाचे उद्घाटन करण्यात आले. आपल्या मागणीची दखल न घेतली जात नसल्याने पैलवानांनी बॅरिकेड्स तोडून नवीन संसदेकडे जाण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी त्यांना रोखताना झटापट झाली. यावेळी विनेश फोगाट, संगीता फोगाट, साक्षी मलिक, बजरंग पुनिया यांच्यासह अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यानंतर पोलिसांनी जंतर-मंतर येथील धरणे आंदोलनाचा मंडप आणि खुर्च्याही हटवल्या.

- Advertisement -

त्यावरून राजकीय स्तरावरून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्वीट केले असून, खेळाच्या माध्यमातून जगभरात भारताची मान गौरवाने उंचावणाऱ्या खेळाडूंसोबत दिल्लीत जे घडले ते नींदनीय आहे. शांततामय मार्गाने विरोध करण्याचा हक्कही न जुमानणाऱ्या आणि दडपशाही मार्गाने लोकांचा आवाज दाबणाऱ्या हुकूमशाही राजवटीचा धिक्कार असो, असे, त्यांनी म्हटले आहे. देशातील प्रत्येक सुजाण नागरिकाने अपल्या तरुण खेळाडूंच्या पाठी ठामपणे उभे रहायला हवे आणि न्यायाची मागणी करायला हवी, असे आवाहनही आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

शरद पवार यांच्याकडूनही निषेध

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कुस्तीपटूंबरोबर झालेल्या झटापटीवरून दिल्ली पोलिसांवर हल्लाबोल केला आहे. लोकशाही मार्गाने आपल्या मागण्यांसाठी न्याय मागत असलेल्या महिला कुस्तीपटूंना दिल्ली पोलिसांनी दिलेली वागणूक अत्यंत वेदनादायक आहे. आपल्या देशाची शान असलेल्या कुस्तीपटूंना अशाप्रकारे वर्तणूक देणे आणि ताब्यात घेणे अत्यंत निषेधार्ह आहे. दिल्ली पोलिसांच्या या कृत्याचा मी तीव्र निषेध करतो. या क्रूरतेच्या कृत्याने आपली लोकशाही मूल्ये अपमानित झाली आहेत, अशा शब्दांत पवारांनी दिल्ली पोलिसांवर नाराजी व्यक्त केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -