अभिनेता अरमान कोहलीचा तुरुंगातील मुक्काम वाढला, हायकोर्टाला जामीन नामंजूर

अभिनेता अरमान कोहलीचा तुरुंगातील मुक्काम वाढला, हायकोर्टाला जामीन नामंजूर

अभिनेता अरमान कोहलीचा तुरुंगातील मुक्काम वाढला, हायकोर्टाला जामीन नामंजूर

अभिनेता अरमान कोहलीचा तरुंगातील मुक्काम वाढला असून हायकोर्टाकडून त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. ड्रग्ज प्रकरणात ऑगस्ट २०२१मध्ये अरमानला अटक करण्यात आली होती. अरमान सध्या मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी एनसीबीच्या रडारवर आले होते. त्यावेळी एका ड्रग्ज पेडलरला एनसीबीने ताब्यात घेतले होते. त्याने बॉलिवूडमधील अनेक कलाकारांमध्ये अरमान कोहलीचे नाव घेतले होते. त्यानंतर एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या मार्गदर्शनात एनसीबीने अरमानच्या राहत्या घरी छापेमारी केली असता एनसीबीने कोकीन जप्त केले. त्यानंतर अरमानला अटक करण्यात आली.

अरमान सोबत असलेल्या करीम धनानी आणि इम्रान अन्सारी या दोन आरोपींना हायकोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला असून त्याला घरी सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र अरमानचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळून लावला आहे. याच वेळी बॉलिवूडचे अनेक सेलिब्रेटी ईडीच्या रडावर आले होते त्यात अभिनेत्री दीपिका पादूकोन,सारा अली खान यासारखी मोठी नावे होती. यांच्या चौकशी अंतर्गत कोणतेही पुरावे एनसीबीच्या हाती लागले नाहीत. मात्र अरमान खानहा मोठ्या ड्रग्ज पेडलरच्या संपर्कात होता याचे काही ठोस पुरावे एनसीबीकडे असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे अरमानला अद्याप जामीन मिळण्याची शक्यता वाटत नाही.

अरमान कोहली हा दिग्दर्शक राज कुमार कोहली आणि अभिनेत्री निशी यांचा मुलगा आहे. अनेक वर्ष बॉलिवूडमध्ये काम करून त्याला हवे तसे यश मिळालेली नाही. त्याने अनेक सिनेमांमध्ये सहाय्यक भूमिका केल्या आहेत. प्रेम रतन धन पायो या सिनेमात अरमान निगेटिव्ह भूमिकेत दिसला होता.


हेही वाचा – Panama Papers Leak: बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला ईडीचा समन्स

First Published on: December 20, 2021 3:54 PM
Exit mobile version