Arunachal Pradesh Brand Ambassador : एकेकाळी मी जेलमध्येही दिवस काढलेत… तुम्ही तर, संजय दत्त झाला व्यक्त

Arunachal Pradesh Brand Ambassador  : एकेकाळी मी जेलमध्येही दिवस काढलेत… तुम्ही तर, संजय दत्त झाला व्यक्त

Arunachal Pradesh Brand Ambassador : एकेकाळी मी जेलमध्येही दिवस काढलेत... तुम्ही तर, संजय दत्त झाला व्यक्त

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता संजय दत्तला अरुणाचल प्रदेशच्या नामकरणाला ५० वर्ष पूर्ण झाल्यानिमत्त अरुणाचल प्रदेशचा ब्रँड अम्बेसेडर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तर संजय दत्तसोबतच अवॉर्ड विनिंग फिल्ममेकर राहुल मित्राला संजय दत्तचा ब्रँड अडव्हाइझर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. यावेळी अरुणाचल प्रदेश सरकारचे आभार मानताना संजय व्यक्त झाला. अरुणाचल सरकारचे आभार मानत संजय दत्तने म्हटले, ,मी एकेकाळी जेलमध्ये दिवस काढले आहेत. जवळपास ६ वर्ष मी जेलमध्ये होतो. तुम्ही तर मला जेलपेक्षा चांगली जागा दिली’. संजय दत्तची इमेज मागील काही वर्षांपासून खराब झाली होती. ६ वर्ष जेलमध्ये राहून आल्यावर संजय दत्तमध्ये अनेक सकारात्मक बदल झाले आहेत.

अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू आणि विधानसभेचे अध्यक्ष पसांग सोना दोर्जी यांनी संजय आणि राहूल यांच्या नियुक्तीची घोषणा केली. संजय दत्त आणि राहूल हे मुंबईहून विमानाने अरुणाचलमध्ये पोहचले. ब्रँड अम्बेसेडर म्हणून नियुक्ती झाल्यानंतर सजंय दत्तने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर अरुणाचल प्रदेश सरकारचे आभार मानले आहेत. ‘एक भारतीय असल्याचा आजवर मला जितका गर्व वाटत नव्हता तितका गर्व आज मला वाटत आहे’,असे संजयने पोस्टमध्ये म्हटले आहे.

संजय दत्तमध्ये झालेले सकारात्मक बदल पाहून त्याचे फॅन्स देखील खुश झाले आहेत. संजयच्या पोस्टनंतर सोशल मीडियावर शुभेच्छांचा पाऊस पडला आहे. अशीच चांगली कामे करत राहण्याचा सल्ला काही फॅन्सनी दिला आहे.

संजयच्या वर्क फ्रँट वर्क विषयी बोलायचे झाले तर संजय दत्त एक वर्षात सर्वाधिक सिनेमे करण्यासाठी प्रसिद्ध आहे. दरम्यानच्या काळात संजयला उत्तम सपोर्टिव्ह रोल्स मिळत आहेत. संजय दत्त मागील काळात ‘तोरबाज’,’भुज’,’सडक२’ आणि ‘पानीपत’ सारख्या सिनेमात दिसला होता. येत्या काळात ‘पृथ्वीराज’,’शमशेरा’,’केजीएफ चँप्टर २’ आणि’ द गुड महाराजा’ या सिनेमात संजय दत्त दिसणार आहे.


हेही वाचा – गायिका शाल्मली खोलगडे बॉयफ्रेंडसोबत अडकली लग्नबंधनात

First Published on: December 1, 2021 9:57 AM
Exit mobile version