‘बाबू’ चित्रपटामध्ये अभिनेत्री नेहा महाजनची एंट्री

‘बाबू’ चित्रपटामध्ये अभिनेत्री नेहा महाजनची एंट्री

'बाबू' चित्रपटामध्ये अभिनेत्री नेहा महाजनची एंट्री

अंकित मोहनची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘बाबू’ या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या एकदम जोमात सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच अंकितचे ऍक्शन सीन्स व्हायरल झाले होते. ऍक्शनचा धमाका असणाऱ्या या चित्रपटात आता अभिनेत्री नेहा महाजनची एंट्री झाली आहे. मराठी, हिंदी चित्रपटांमधून घराघरात पोहोचलेली नेहा महाजन या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या तिचा या चित्रपटातील लूक सोशल मीडियावर व्हायरल होत असून, यात तिने लाल रंगाची साडी नेसलेली दिसत आहे. त्यामुळे नेहाचा हा एकंदर पेहराव बघून या चित्रपटाविषयीची प्रेक्षकांमधील उत्सुकता आता अधिकच वाढली आहे.

 

आता नेहाची भूमिका काय आहे, याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक मयूर मधुकर शिंदे हे असून निर्माता बाबू के. भोईर हे आहेत. श्री कृपा प्रोडक्शन निर्मित ‘बाबू’ या चित्रपटात अंकित मोहन, नेहा महाजन यांच्यासोबत रुचिरा जाधवही दिसणार आहे.

हँडसम आणि डॅशिंग अभिनेता अंकित मोहन ‘बाबू’ या सिनेमात मुख्य भूमिका साकारणार आहे. या पोस्टरमध्ये अतिशय रावडी अंदाजात दिसणारा अंकित भाव खाऊन जात आहे. अंकितच्या या लूकने अभिनेत्याबद्दल असलेली प्रेक्षकांची उत्सुकता तर कमी केली, मात्र त्याचा हा लुक पाहून आता सिनेमाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे. अंकित हा मराठी प्रेक्षकांसाठी नवीन नाही. त्याने यापूर्वी अनेक मोठ्या आणि गाजलेल्या ऐतिहासिक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे.


हे ही वाचा – सॅम डिसुजा मनी लाँड्रिंगमधील मोठा खिलाडी; इंटरवलनंतर मी गोष्टी समोर आणणार – संजय राऊत


 

 

First Published on: October 25, 2021 12:27 PM
Exit mobile version