तुनिषा शर्माला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपात एक्स बॉयफ्रेंडला अटक

तुनिषा शर्माला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपात एक्स बॉयफ्रेंडला अटक

हिंदी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री तुनिषा शर्माने शनिवारी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. हिंदी वाहिनीवरील ‘दास्तान-ए-काबुल’ या मालिकेत ती मुख्य भूमिका साकरात होती. तिने मालिकेच्या सेटवरील मेकअप रुममध्ये गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. वसईच्या कामन परिसरातील एका स्टुडिओमध्ये ही घटना घडली आहे. याचं प्रकरणात पोलिसांनी मालिकेतील सहकलाकार अभिनेता शीजान मोहम्मद खानला अटक केली आहे.

खरंतर, पोलिसांनी शीजानवर तुनिषाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याची तक्रार दाखल केली आहे. तुनिषाच्या आईने शीजानवर हे आरोप केले आहेत. त्यामुळे पोलिसांनी रात्री उशीरा शीजानवर भारतीय दंड संहिता कलम 306 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘दास्तान-ए-काबुल ‘या मालिकेतील अभिनेत्री तुनिषा शर्माचा मालिकेतील सहकलाकार शीजान खानने तुनिषाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. खरंतर, शीजान आणि तुनिषा एकमेकांना डेट करत होते. नुकत्याच काही दिवसांपूर्वी त्यांचा ब्रेकअप झाला होता. ज्यामुळे ती सतत चिंतेत असायची. त्यामुळे तुनिषाच्या नातेवाईकांनी शीजान तिला त्रास देत असल्याचा गुन्हा दाखल केला आहे.


हेही वाचा :

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माची आत्महत्या

First Published on: December 25, 2022 10:13 AM
Exit mobile version