घरताज्या घडामोडीप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माची आत्महत्या

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माची आत्महत्या

Subscribe

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तिने मालिकेच्या सेटवरील मेकअप रुममध्ये गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. वसईच्या कामन परिसरातील एका स्टुडिओमध्ये ही घटना घडली आहे. परंतु तिच्या आत्महत्येचं कारण अद्यापही समोर आलेलं नाहीये.

मिळालेल्या माहितीनुसार, तुनिषा शर्माने दुपारच्या दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केली. वसई पूर्वेच्या कामण येथील एका स्टुडिओमधील प्रसाधनगृहात तिने गळफास घेतला. या प्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुनिषा सब टीव्हीच्या दास्तान-ए-काबुल या शोमध्ये मुख्य भूमिकेत काम करत होती. याच मालिकेचं शूटिंग सुरू असताना सेटवरील मेकअप रूममध्येच तिने गळफास घेतला. तुनिषाने आत्महत्या केल्यानंतर सेटवरील लोकांनी तिला रुग्णालयात नेलं होतं, परंतू त्याठिकाणी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केल्याचं कळतंय.

- Advertisement -

सेटवर मेकअप करत असतानाची स्टोरी तुनिषाने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. ही स्टोरी आत्महत्येच्या काही वेळ आधी तुनिषाने शेअर केली होती. तिने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली होती का त्याचा आम्ही तपास करत आहोत, अशी माहिती वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास बर्वे यांनी दिली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tunisha Sharma (@_tunisha.sharma_)

- Advertisement -

तुनिषा शर्मा ही दास्तान-ए-काबुल या मालिकेमध्ये काम करत होती. या मालिकेमध्ये ती मुख्य भूमिका साकारत होती. तुनिषा २० वर्षांची होती आणि आतापर्यंत तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. तुनिषा फितूर, बार बार देखो, कहानी २: दुर्गा रानी सिंह, दबंग ३ यांसारख्या चित्रपटांमध्येही दिसली होती. तुनिषाने पाच वर्षांपूर्वी आलेल्या ‘फितूर’ चित्रपटात छोट्या कतरिनाची भूमिका साकारली होती. मात्र, आता तुनिषाने टोकाचे पाऊल उचलल्यामुळे इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.


हेही वाचा : वादग्रस्त डान्सर गौतमी पाटीलची आता थेट चित्रपटात


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -