Tuesday, May 7, 2024
घरमानिनीDiaryZeenat Aman यांनी आडनावामागील सांगितली स्टोरी

Zeenat Aman यांनी आडनावामागील सांगितली स्टोरी

Subscribe

जीनत अमान यांनी एक स्टोरी शेअर केली आहे. त्यामध्ये त्यांनी असे सांगितले आहे की, त्यांच्या आई-वडिलांची ओळख कशी झाली, कशा प्रकारे त्यांनी लग्न केले आणि नंतर विभक्त झाले. त्यांनी असे सुद्धा सांगितले की, त्याच्या वडिलांनी मुगल-ए-आजम आणि पाकीजा सारख्या सिनेमांच्या स्क्रिप्टवर काम केले होते. सदाबाहर अभिनेत्री जीनत अमान यांनी पुन्हा एकदा आपल्या आठवणी ताज्या करत त्यांच्या आडनावाची स्टोरी आज फादर्स डे निमित्त सांगितली आहे.

अमान नावामागील स्टोरी
जीनत अमान यांनी अशी सुद्धा माहिती दिली आहे की, त्यांचे वडिल उर्दूत काही कविता लिहायचे. त्या त्यांना ट्रांन्सलेट करुन प्रकाशित करायच्या आहेत. जीनत यांनी असे सुद्धा म्हटले की, त्यांचे आडनाव अमान कसे पडले. इंस्टाग्रामवक आपल्या बालपणीचा एक फोटो शेअर करत या विषयावर त्यांनी अधिक माहिती दिली आहे.

- Advertisement -

” हा अत्यंत मौल्यवान फोटो आहे. हा फोटो एका स्टुडिओत काढण्यात आला आहे. जेव्हा मी लहान होती. माझे वडील माझ्या मागे बसले आहेत आणि अन्य नातेवाईक पुढे बसले आहेत. माझे वडिल अमानुल्लाह खान रॉयल परिवारातील होते. त्यांची आई अख्तर जहां बेगम ही भोपाळ मधील शेवटच्या राजाची पहिली कजीन होती. त्यांचे नाव नवाब हमीदल्लाह खान असे होते.

- Advertisement -

पुढे त्यांनी असे लिहिलेय की, अमान साहब यांची काही भावंड होती. सर्वजण भोपाळमध्ये उत्तम आयुष्य जगत होते. तय्यांना अत्यंत सुंदर मानले जायते. ते मुंबईत आले आणि हिंदी सिनेमांमध्ये आपली जादू चालवू लागते. तेथेच त्यांची भेट माझी आई वर्धिनी सिंधिया हिच्याशी झाली. दोघं खरंतर एका पार्टीत भेटले होते. दोघांमध्ये अफेअर सुरु झाले आणि त्यांनी लग्न ही केले. दोघांच्या परिवराने त्यांच्या लग्नाला स्विकारले नाही. कारण माझी आई हिंदू होती आणि वडील मुस्लिम. लहानश्या अभिनय करियरनंतर अमान साहब हे लेखक बनले. त्यांनी काही सिनेमांमध्ये स्क्रिनप्ले आणि डायलॉग्स लिहिले. त्यामध्ये मुघल-ए-आजम आणि पाकीजा सुद्धा समावेश आहे. अत्यंत प्रभावशाली असण्यासह त्यांना एका लेखकाच्या रुपात फार सन्मान मिळत होता. मला असे वाटायचे की, त्यांना त्यांचा ड्यू मिळालेला नाही. लेखकांना तो फार कमी मिळतो.

माझ्या जन्मानंतर माझ्या आई-वडिलांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. मी माझ्या आईसोबत होती. माझ्या वडिलांनी माउंट मेरी हिलमध्ये एक बंगला खरेदी केला होता. मी त्यांच्यासोबत लॉन्ग वॉकसाठी जायची. मला ते आइस्क्रिम घेऊन द्यायचे. ते मला स्टोरीज सांगायचे आणि उर्दू कविता सुद्धा ऐकवायचे. ज्या त्यांनी खासकरुन माझ्यासाठी तयार केल्या होत्या. काही वेळेस ते माझ्यासाठी आणि आईसाठी सुंदर पत्र सुद्धा लिहायचे.

अशाच काही आठवण माझ्या वडिलांसोबतच्या आहेत. त्यांचे निधन वयाच्या 41 व्या वर्षी झाले. तेव्हा मी शाळेतच होती. मला असे वाटत होते की, मला त्यांचा अजून सहवास हवा होता, जेणेकरुन मी त्यांना अधिक समजू शकली असती. त्यांच्या उर्दू कविता माझ्या फार हृदयाजवळ आहेत. मी एक दिवस त्या ट्रांन्सलेट करुन जरुर प्रकाशित करेन. या फायर्स डे निमित्त माझे वडिल अमानुल्लाह खान यांना मिस करतेय , ज्यांचे नाव मी माझे आडनाव म्हणून नेहमीच लावते.

- Advertisment -

Manini