घरमनोरंजन40 वर्षापासून 'या' आजाराने त्रस्त आहे झिनत अमान

40 वर्षापासून ‘या’ आजाराने त्रस्त आहे झिनत अमान

Subscribe

बॉलिवूडमध्ये 70 च्या दशकातील ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून झिनत अमान यांना ओळखले जाते होते. झिनत अमान या वय 71 व्या वर्षाच्या असून त्या इंस्टाग्रामवर चांगल्या सक्रिय असतात. दरम्यान, नुकत्याच समोर आलेल्या बातमीनुसार झिनत अमान मागील 40 वर्ष Ptosis नावाच्या आजाराने त्रस्त आहेत. याबाबत सोशल मीडियाद्वारे त्यांनी स्वतः सांगितले आहे.

आजारबद्दल झिनत अमान यांनी दिली माहिती

 

View this post on Instagram

 

A post shared by Zeenat Aman (@thezeenataman)

झिनत अमान यांनी नुकत्याच काही तासांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी त्यांचा रुग्णालयातील एक फोटो शेअर केला या फोटोमध्ये झिनत त्यांच्या मुलासोबत दिसत आहेत. शिवाय फोटोसोबत त्यांनी कॅप्शनमध्ये याबाबत माहिती दिली आहे.

- Advertisement -

झिनत यांनी लिहिलंय की, “18 मे 2023 रोजी मी वोग इंडियाच्या कव्हरसाठी शूट केले आणि 19 मे 2023 रोजी मी सकाळी लवकर उठले, एक लहान सुटकेस पॅक केली, लिलीचे चुंबन घेतले आणि नंतर जहाँ-काराने माझे चुंबन घेतले आणि मला हिंदुजा हॉस्पिटलमध्ये नेले.”

पुढे त्यांनी लिहिलंय की, मागील 40 वर्ष माझ्यासोबत एक हत्ती राहत आहे ज्याला बाहेरचा रस्ता दाखवण्याची वेळ आली आहे. मला Ptosis नावाचा आजार आहे. जो मागील काही वर्षांपूर्वी लागलेल्या एका लहान दुखापतीचा परिणाम आहे. त्यावेळी आणि त्यानंतर अनेक वर्षे या आजारावर कोणताही इलाज नव्हता. त्यानंतर या वर्षी एप्रिलमध्ये एका नेत्ररोग तज्ज्ञाने मला सांगितले की सर्व गोष्टी निश्चित केल्या जाऊ शकतात आणि पापणी उचलून माझी दृष्टी पूर्ववत करण्याचा एक मार्ग आहे. शस्त्रक्रिया शक्य आहे.” असं झिनत यांनी लिहिलं आहे.


हेही वाचा : मला भीती वाटते… डीपनेक फेक व्हिडीओवर रश्मिकाने पहिल्यांदा दिली प्रतिक्रिया

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -