Sunday, April 28, 2024
घरमानिनीDiaryलग्नाविनाच जुळ्या मुलांचा पिता झालेल्या single बाबाची कहाणी

लग्नाविनाच जुळ्या मुलांचा पिता झालेल्या single बाबाची कहाणी

Subscribe

लग्न म्हणजे कुटुंब वाढवणं, जबाबदाऱ्या पार पाडणे ऐवढ्या पुरतेच मर्यादित नसते. अशा काही गोष्टी सुद्धा असतात ज्यामुळे व्यक्ती हा लग्नानंतर पूर्णपणे बदलला जातो. आपल्या येथे लग्नापूर्वी मुलाला किंवा मुलीला पगार किती, कुठे नोकरी करते हे प्रामुख्याने पाहिले जाते. अशातच जर शासकीय नोकरी असेल तर आणखीच उत्तम. लग्नासाठी बोलणी पुढे जाते. परंतु अशा काही व्यक्ती असतात त्यांचे आयुष्य अगदी सुरळीत सुरु असते पण त्यांना लग्न करायचे नसते आणि मुलं हवी असतात. अशी ही काही प्रकरणे आपण पाहिली असतील. परंतु आज फादर्सडेच्या निमित्ताने आपण एका अशा बाबाची कथा पाहणार आहोत जो दोन जुळ्या मुलांचा बाबा झाला आहे.(Fathers Day 2023)

खरंतर ही कथा सुरत मधील प्रीतेश दवे याची आहे. प्रीतेश त्या नशीबवान व्यक्तींपैकी एक आहे ज्यांना सरोगेसीच्या माध्यमातून बाबा होण्याचे सौभाग्य मिळाले. हेच कारण आहे की, देशात आता सरोगेसीचे नवे नियम लागू करण्यात आले आहेत.

- Advertisement -

दवे यांच्याबद्दल सांगताना इनफर्टिलिटी स्पेशलिट डॉ. पार्थ बाविशी यांनी असे म्हटले की, दवे यांना ही संधी सरोगेसीचे नवे नियम लागू होण्याआधीच मिळाली. त्यांनी असे म्हटले की, नव्या नियमानुसार सिंगल पुरुष, महिला आणि लिव्ह-इन आणि सेम सेक्स कपल्सला सेरोगेसीची परवानगी नाही. पण दवे हे स्वत:ला नशीबवान मानतात. दवे हे आपल्या आई-वडिलांसोबत सुरतला राहतात. तर भावनगर मध्ये एक नॅशनलाइज्ड बँकेसाठी ग्राहक सेवा केंद्र चालवतात.

प्रीतेश दवे यांचे असे म्हणणे आहे की, धैर्य आणि दिव्या ( जुळी मुलं) आयुष्यात आल्याने सर्वकाही बदलले गेले आहे. त्यांनी असे म्हटले की, मला लग्नासाठी मुलगी मिळाली नाही, त्यामुळे आई-वडिल खुप नाराज होते. परंतु जुळी मुलं घरी आल्यानंतर आपले घर आनंदाने भरुन गेले. मुलांचा सांभाळ करण्यासाठी दवे यांच्या आईने सुद्धा हातभार लावला. आता माझ्याकडे आयुष्य जगण्यासाठी एक परिवार असल्याचे दवे म्हणतात. (Fathers Day 2023)

- Advertisement -

दवे पुढे असे म्हणतात, समाजाता अशी काही पुरुष मंडळी आहेत ज्यांना लग्नासाठी महिला मिळत नाही. यामागील कारण आहे की, आई-वडिल आपल्या मुलींचे लग्न शासकीय मुलांसोबत करु इच्छितात. दवे यांना 12 वी नंतर शिक्षण घेता आले नाही. आमच्याकडे जमीन, संपत्ती सर्वकाही आहे. पण त्याचा काही उपयोग नाही.


हेही वाचा- एक तृतीयांश महिलांवर लादलं जात मातृत्व

- Advertisment -

Manini