‘जर मी छताला लटकलेले दिसले तर ती आत्महत्या नसेल’, पायलचं धक्कादायक ट्विट!

‘जर मी छताला लटकलेले दिसले तर ती आत्महत्या नसेल’, पायलचं धक्कादायक ट्विट!

पायल घोष

अभिनेत्री पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर गैरवर्तनाचा आरोप केला. अनुराग कश्यपने माझ्यासोबत गैरवर्तन केलं असून मला अत्यंत वाईट पद्धतीची वागणूक दिली आहे असे आऱोप पायलने ट्विटरवरून केले होते. आता पायलने आणखी एक ट्विट केलं आहे. हे ट्विट सध्या व्हायरल होत आहे. या ट्विटमध्ये पायलने म्हटलं आहे की, मी छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर ती आत्महत्या नसेल असं तीने ट्विटमध्ये म्हटलं आहे.

पायलचं हे ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, पायल म्हणते, मी अनुराग कश्यपशी संबंधीक एका पोर्टलला मुलाखत दिली. पण नंतर मला समजले की ते पोर्टल यासाठी अनुरागची परवानगी घेत आहेत. मी जर छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले तर एक गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे मी आत्महत्या केलेली नसेन.

अनुराग कश्यपने लैंगिक शोषण केल्याचा आरोप पायलने केला. बलात्कार, गैरवर्तन आणि चुकीचे कृत्य केल्याप्रकरणी कलम ३७६,३५४,३४१ आणि ३४२ अंतर्गत अनुराग कश्यपविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबईतील वर्सोवा पोलीस ठाण्यात अनुराग विरोधात एफआयआर दाखल केला आहे. पायलचे वकील नितीन सातपुते यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली.

अनुरागवर पायलने केले आरोप

पालने अनुरागवर आरोप केले आहेत की,  “अनुराग कश्यपने माझ्यासोबत गैरवर्तन केलं असून मला अत्यंत वाईट पद्धतीची वागणूक दिली आहे. कृपया या व्यक्तीविरोधात काही तरी कारवाई करा, ज्यामुळे या माणसाचं खरं रुप समोर येईल. असे ट्विट पायलने केले होते.


हे ही वाचा – सिनेदिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यावर लैंगिक अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल


First Published on: September 24, 2020 5:08 PM
Exit mobile version