घरमनोरंजनसिनेदिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यावर लैंगिक अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल

सिनेदिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यावर लैंगिक अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल

Subscribe

बॉलिवूडमधील एक नामांकित सिनेदिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यावर अखेर मंगळवारी रात्री उशिरा वर्सोवा पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचारप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. एका अभिनेत्रीने दिलेल्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल झाला असून लवकरच त्यांची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. कोलकाताची रहिवाशी असलेल्या या अभिनेत्रीला बॉलिवूडमध्ये करिअर करायचे होते, त्यासाठी ती मुंबईत आली होती. ‘साथ निभाना साथीया’ या मालिकेत तिने राधिकाची भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने काही हिंदी, तामिळ आणि कन्नड चित्रपटात काम केले होते.

सहा वर्षांपूर्वी तिची अनुराग कश्यपशी ओळख झाली होती. एका भेटीदरम्यान अनुरागने तिच्याशी अश्लील वर्तन करून तिचा विनयभंग केला होता, काही वेळानंतर त्यांनी तिच्याशी लैंगिक अत्याचार करण्याचाही प्रयत्न केला होता. अनुरागच्या ‘बॉम्बे वेलवेट’वर काम करण्यासाठी पायल ही इच्छुक होती. त्यामुळे ती त्यांना भेटण्यासाठी गेली होती. यावेळी अनुरागने तिला एक प्रौढ चित्रपट दाखवून तिला काम मिळविण्यासाठी मुली त्याच्यासोबत झोपायला तयार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर तो अचानक तिच्यासोबत नग्नावस्थेत आला होता. या प्रकाराने ती प्रचंड घाबरली आणि तिने तिची तब्येत बरी नसल्याचे कारण पुढे करुन तेथून पळ काढला होता. घडलेला प्रकार तिने तिच्या मैत्रिणीला सांगितला.

- Advertisement -

मात्र, तिने तिला याबाबत कोणाशी काहीही न बोलण्यास सांगितले. त्यानंतर ती त्यांना कधीच भेटली नाही. सहा वर्षांनंतर तिने अनुरागवर हा आरोप करून एकच खळबळ उडवून दिली होती. अखेर अ‍ॅड. नितीन सातपुते यांची भेट घेतल्यानंतर तिने हा प्रकार त्यांना सांगितला. त्यानंतर त्यांनी मंगळवारी सायंकाळी वर्सोवा पोलीस ठाण्यात अनुराग कश्यपविरुद्ध लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर अनुराग कश्यप यांच्याविरुद्ध रात्री उशिरा विनयभंगासह बलात्कार व अन्य भादंवि कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरू असून लवकरच अनुराग यांची पोलिसांकडून जबानी नोंदविण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -