‘धाकड’ फ्लॉप, तरीही कंगनाचा तोरा कायम म्हणते…

‘धाकड’ फ्लॉप, तरीही कंगनाचा तोरा कायम म्हणते…

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतचा (Kangana Ranaut) ‘धाकड’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला आहे. हा चित्रपट त्याच्या खर्चाच्या 10 टक्केही पैसा वसूल करू शकला नाही. ‘धाकड’च्या फ्लॉपमुळे आता कंगनाला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले जातेय. मात्र ‘धाकड‘सह याआधीच्या फ्लॉप चित्रपटांनंतरही कंगनाचा तोरा अद्याप कमी झालेला नाही. अशात कंगनाने ‘धाकड‘च्या फ्लॉपनंतर सोशल मीडियावर स्वत:चा बचाव करत एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने लिहिले की, 2022 अद्याप संपलेला नाही. (Kangana Ranaut Dhakad Film Flop)

बॉक्स ऑफिसची क्वीन

कंगनाने तिच्या पोस्टमध्ये स्वत:चे बॉक्स ऑफिसची क्वीन म्हणून वर्णन करत लिहिले की, 2019 मध्ये मी 160 कोटी रुपयांचा सुपरहिट मणिकर्णिका दिला. 2020 हा कोरोनाचा काळ होता. 2021 मध्ये मी करियरमधील सर्वात सुपरहिट थलायवी दिला. जो ओटीटीवर सर्वात सुपरहिट ठरला. कंगनाने पोस्टमध्ये पुढे लिहिले की, मला खूप नकारात्मकतेचा सामना करावा लागला पण 2022 मध्ये लॉक अपचे होस्टिंग ब्लॉकबस्टर होते आणि हे वर्ष अजून संपलेले नाही. अजून खूप आशा आहे.

दरम्यान 8 व्या दिवशी संपूर्ण भारतात धाकडची फक्त 20 तिकिटे विकली गेली. यातून चित्रपटाने 440 रुपयांची कमाई केली. बॉक्स ऑफिसवर चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर या चित्रपटाचे OTT आणि सॅलेलाईट राइट्स विकले जात आहे. रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाच्या सुपर फ्लॉपनंतर आता त्याचे ओटीटी आणि सॅटेलाइट राइट्सही विकले जात नाहीत. कारण, मेकर्सना खरेदीदाही मिळत नाही.

दरम्यान ओटीटी आणि सॅटेलाईट्सचे हक्क विकले जात नाहीत. यात धाकड एक अडल्ट चित्रपट असल्याने मेकर्सना टीव्हीवरही हा चित्रपट दाखवण्यासाठी प्रमाणपत्र घ्यावे लागेल, मात्र ही प्रक्रिया खूप मोठी आहे. दरम्यान या चित्रपटाला चाहते आणि समीक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला नाही.

मात्र, ‘धाकड‘च्या निर्मात्यांना आता कमी किंमतीत चित्रपटाच्या राइट्सवर तोडगा काढावा लागणार आहे. “धाकड’ हा चित्रपट सुमारे 100 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनला आहे. त्यामुळे निर्मात्यांचे नुकसान हे अकल्पनीय आहे. रजनीश घई दिग्दर्शित हा अॅक्शन थ्रिलर चित्रपट 20 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. कंगनाशिवाय या चित्रपटात अर्जुन रामपाल, दिव्या दत्ता आणि शाश्वत चॅटर्जी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात कंगना एजंट अग्नीच्या भूमिकेत दिसत आहे.

कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तिने तिच्या आगामी पॉलिटिकल ड्रामा चित्रपट ‘इमर्जन्सी’चे शूटिंग सुरू केले आहे. याशिवाय ती ‘तेजस’मध्ये दिसणार आहे. त्याचवेळी ती ‘मणिकर्णिका रिटर्न्स’ आणि ‘सीता’मध्येही दिसणार आहे.


सई ताम्हणकरने केला तिच्या अंर्तवस्त्रांबाबत खुलासा…! शेअर व्हिडीओमुळे चर्चांना उधाण


First Published on: June 6, 2022 5:28 PM
Exit mobile version