सई ताम्हणकरने केला तिच्या अंर्तवस्त्रांबाबत धक्कादायक खुलासा…! शेअर व्हिडीओमुळे चर्चांना उधाण

मराठी सिनेसृष्टीतील बोल्ड ॲण्ड ब्यूटीफुल अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरला ओळखले जाते. सईने मराठी टेलिव्हिजनपासून ते मोठमोठ्या चित्रपटांपर्यंत आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. सई ताम्हणकरला मराठीसिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी ओळखले जाते. मात्र सोशल मीडियावरील नवनवीन पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असणारी सई आता पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. याचे कारण म्हणजे अभिनेत्री सई ताम्हणकरला इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी म्हणजेच आयफा (IIFA) या पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावलेला आहे. सईला ‘मिमी’ या हिंदी चित्रपटातील तिच्या भूमिकेसाठी पुरस्कार प्राप्त झाला. नुकत्याच पटकावलेल्या या पुरस्कारामुळे सई चर्चेत असतानाच आता सईने एक वक्तव्य केलं आहे ज्यामुळे ती चर्चेत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून बऱ्याच मराठी अभिनेत्री अंर्तवस्त्रांबाबत आपले मत मांडत असतानाच सईने सुद्धा तिच्या अंर्तवस्त्रांबाबत एक खुलासा केला आहे.

सई ताम्हणकरने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या मैत्रिणीसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. सईने शेअर केलेल्या या रिलमध्ये तिची मैत्रिण तिला मस्करीमध्ये ‘तुम्ही तुमची आवडती ब्रा का धुत नाही?’असा प्रश्न विचारते. तेव्हा सई तिला, ‘मला बरं वाटंत, खूप मजा येते.’ असं म्हणते. या व्हिडीओमध्ये दोघीही एका रिल्सच्या डायलॉगवर लिप्सिंग करताना दिसत आहेत.

दरम्यान, यावर्षी सईने आयफा (IIFA) या पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावून मराठी चित्रपटसृष्टीची मान उंचावलेली आहे.

 


 

हेही वाचा :http://Smart Jodi : अंकिता लोखंडे आणि विक्की जैनने पटकावले ‘स्मार्ट जोडी’चे विजेतेपद