‘कौन बनेगा करोडपती’: शो करण्यापूर्वी अमिताभ बच्चन यांनी ठेवली ‘ही’ अट

‘कौन बनेगा करोडपती’: शो करण्यापूर्वी अमिताभ बच्चन यांनी ठेवली ‘ही’ अट

‘कौन बनेगा करोडपती'(KBC) करोडपती हा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहे. अनेक वर्षांपासून या कार्यक्रमाने त्याची लोकप्रियता अबाधित तेहवली आहे. दिवसागणिक या कार्यक्रमाची लोकप्रियता वाढतच आहे. विविध विषयांवरील माहितीचा एक उत्तम स्रोत म्हणून या कार्यक्रमाकडे पाहिलं जातं. लवकरच या कार्यक्रमाचं १४ व पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक जेष्ठ बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या मुळे या कार्यक्रमाला विशेष महत्व प्राप्त झालं आहे. या कार्यक्रमात भाग घेतलेल्या प्रत्येक स्पर्धकाशी अमिताभ बच्चन विनम्रतेने बोलतात त्याचबरोबर त्यांच्या बोलण्यात मोकळेपणा सुद्धा असतो. या कार्यक्रमाचे दिग्दर्शक अरुण शेषकुमार यांनी या कार्यक्रमासंदर्भात काही खुलासे केले आहेत. त्याचबरोबर अमिताभ बच्चन(amitabh bachchan) यांच्या सोबत काम करतानाच अनुभव सुद्धा संगितला. त्याचबरोबर त्यांनी जी अट घातली त्याबद्दलही अरुण शेषकुमार म्हणाले.

हे ही वाचा – ‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वाचा होस्ट कोण? महेश मांजरेकर नाही तर ‘या’ अभिनेत्याच्या नावाची चर्चा

‘कौन बनेगा करोडपती'(KBC) या कार्क्रमाचे दिग्दर्शक अरुण शेषकुमार यांनी नुकताच एका वृत्तसंस्थेशी संवाद सांधला. त्यावेळी ते म्हणाले, ‘कौन बनेगा करोडपती हा एक अतिशय चांगला कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामुळे तुमच्या ज्ञानात भर पडते. तुम्ही जे वाचलं आहे, लिहिलं आहे त्या आधारेच तुम्ही या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता’. अरुण शेषकुमार यांना अमिताभ बच्चन यांच्या बद्दलही विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले, ‘अमिताभ बच्चन(amitabh bachchan) हे या कार्यक्रमाचे मुख्य व्यक्ती आहेत. आम्ही त्यांना या शो चे कंडक्टर असेही म्हणतो. हा संपूर्ण शो ते चालवतात आणि मुख्य म्हणजे प्रत्येक परिस्थितीत ते फार जुळवून घेतात. त्याचबरोबर ते स्पर्धकांवर आलेला तणाव दूर करण्याचा प्रयत्न सुद्धा ते करतात’.

हे ही वाचा – ‘एकदा काय झालं…’च्या निमित्ताने सलील कुलकर्णींनी सांगितली आजोबांची आठवण

जेव्हा आम्ही अमिताभ बच्चन(amitabh bachchan) यांना या कार्यक्रमाबद्दल सांगितले तेव्हा त्यांनी आमच्यासमोर एक ठेवली. आणि ती अट वंजारी का पाळली गेली तरच मी हा शो करेन असं अमिताभ बच्चन यांनी सांगितल्याचे अरुण शेषकुमार म्हणले. ‘कार्यक्रम पूर्णपणे प्रोफेशनल पद्धथीने चालविण्यात यावा’ अशी अट अमिताभ बच्चन यांनी घातली होती. केबीसीच्या सेट वर प्रत्येक गोष्ट नीट, जागच्या जागी आहे की नाही हे कटाक्षाने पाहिलं जायचं. त्यांच्या या अटीमुळे सुरुवातीला मला दबावाखाली काम करावं लागलं. त्याचबरोबर ते सेट वर आले की पूर्ण शांतता असायची. असंही अरुण शेषकुमार म्हणाले.

हे ही वाचा – KBC Complete 1000 Episodes: केबीसीचे १ हजार एपिसोड पूर्ण होताच बिग बी झाले भावूक

First Published on: August 3, 2022 1:37 PM
Exit mobile version