घरमनोरंजन'बिग बॉस' मराठीच्या चौथ्या पर्वाचा होस्ट कोण? महेश मांजरेकर नाही तर 'या'...

‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वाचा होस्ट कोण? महेश मांजरेकर नाही तर ‘या’ अभिनेत्याच्या नावाची चर्चा

Subscribe

'बिग बॉस' मराठीचे तीनही पर्व हिट झाले. प्रेक्षकांनी सुद्धा या कार्यक्रमाला पसंती दिली. त्या नंतर आता 'बिग बॉस' मराठीच्या चौथे पर्व( new season) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महेश मांजरेकर यांच्या जागी 'बिग बॉस' मराठीचा होस्ट म्हणून कोण येणार आहे याचीच चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे.

छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रम म्हणून ‘बिग बॉस'(bigg boss) या कार्यक्रमाची नेहमीच चर्चा असते. या कार्यक्रमात दररोज काही न काही वेगळ्या गोष्टीघडत असतात. ‘बिग बॉस’ मराठीच्या(bigg boss marathi) घरात येणारे स्पर्धक, त्यांच्यात होणारी मैत्री, वाद, नवीन टास्क या सगळ्यामुळेच हा कार्यक्रम नेहमीच चर्चेत असतो. तर प्रेक्षक सुद्धा कलाकारांना ‘बिग बॉस’च्या घरात स्पर्धक म्हणून पाहण्यासाठी उत्सुक असतात. ‘बिग बॉस’ मराठीचे तीनही पर्व हिट झाले. प्रेक्षकांनी सुद्धा या कार्यक्रमाला पसंती दिली. त्या नंतर आता ‘बिग बॉस’ मराठीच्या चौथे पर्व( new season) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘बिग बॉस’ मराठीच्या आधीच्या तीनही पर्वांचं सूत्रसंचालन अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी केलं होतं. पण आता नवीन पर्वाचं सूत्रसंचालन महेश मांजरेकर(mahesh manjarekar) करणार नाही अश्या चर्चा सुरु आहेत. महेश मांजरेकर यांच्या जागी ‘बिग बॉस’ मराठीचा होस्ट म्हणून कोण येणार आहे याचीच चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – चर्चा तर होणारच: ‘Bigg Boss मराठी’ ४ टीझर आऊट

- Advertisement -

‘बिग बॉस’ मराठी(bigg boss marathi) या कार्यक्रमाच्या तीनही पर्वांचं सूत्रसंचालन महेश मांजरेकर यांनी केलं होतं. ‘बिग बॉस’ मराठीच्या निर्मात्यांनी महेश मांजरेकरांसोबत(mahesh manjarekar) तीन वर्षांचं कॉन्ट्रॅक्ट केलं होतं. ते कॉन्ट्रॅक्ट आता संपलं आहे. त्यामुळे महेश मांजरेकर यांच्या ऐवजी ‘बिग बॉस’ मराठी कार्यक्रमाचा नवा होस्ट कोण असणार असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.

‘बिग बॉस ‘ मराठीच्या चौथ्या पर्वाचा होस्ट म्हणून, मराठी मधील आघाडीचा कलाकार अशी ओळख असलेला अभिनेता ‘सिद्धार्थ जाधव'(siddharth jadhav) होस्ट करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सिद्धार्थ जाधव यांनी मराठी चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. त्याने त्याच्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे. मराठी सोबतच सिद्धार्थ जाधवने हिंदी चित्रपटांमध्ये विशेष बहुमूक साकारल्या आहेत. सिद्धार्थ जाधव लवकरच ‘बिग बॉस’ मराठीच्या नव्या पर्वाचा होस्ट म्ह्णून प्रेक्षकांसमोर येणार आहे. असं बोललं जात आहे.

हे ही वाचा – Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस मराठीच्या घरात पुन्हा सुरू होणार कल्ला

दरम्यान ‘बिग बॉस’ मराठीच्या(big boss marathi) नव्या पर्वाचा होस्ट अभिनेता सिद्धार्थ जाधव(siddharth jadhav) असणार असं बोललं जात आहे. पण या संदर्भात अद्याप स्पष्ट अशी कोणतीही महिरती समोर आलेली नाही. त्याचबरोबर सिद्धार्थने ही या संदर्भात कोणताही खुलासा केलेला नाही. त्यामुळे सिद्धार्थ जाधव या शोचा होस्ट असणार असणार की नाही याबाबत विविध तर्क – वितर्क काढले जात आहेत.

मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव लवकर ‘दे धक्का २'(de dhakka 2) या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर रोहित शेट्टी यांच्या ‘सर्कस’ या हिंदी चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार आहे.

हे ही वाचा – बाप्पासोबत खास फोटो: चिमुकल्या परीचा मराठमोळा साज; तिलाही लागलीय गणेशोत्सवाची आस

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -