घरताज्या घडामोडीKBC Complete 1000 Episodes: केबीसीचे १ हजार एपिसोड पूर्ण होताच बिग बी...

KBC Complete 1000 Episodes: केबीसीचे १ हजार एपिसोड पूर्ण होताच बिग बी झाले भावूक

Subscribe

केबीसीच्या प्रवासात माझे संपूर्ण आयुष्य बदलले

काळ बदलला असेल,मनोरंजानाची माध्यमे बदलली असली तरीही अमिताभ बच्चन यांचा ‘कौन बनेगा करोडपती’ हा कार्यक्रम आजही लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीचा आहे. ३ जुलै २०००मध्ये हिंदी टेलिव्हीजनवर सुरू झालेल्या दिमाखदार कार्यक्रमाला तब्बल २१ वर्ष पूर्ण झाली आहेत. कार्यक्रमाचा सध्या १३वा सीझन सुरू आहे आणि कार्यक्रमाचे १००० हजार एपिसोड पूर्ण झाले आहेत. नुकताच कार्यक्रमाचा एक हजारावा एपिसोड शुट करण्यात आला आहे. या एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन आणि तिची मुलगी नव्या नवेली स्पेशल गेस्ट म्हणून उपस्थित होते. यावेळी श्वेता बच्चनने केबीसीच्या संपूर्ण प्रवासाविषयी बिग बींना प्रश्न विचारले आणि या प्रश्नांची उत्तरे देताना बिग बी फार भावूक झाले.

- Advertisement -

नुकताच कार्यक्रमाचा एक हजाराव्या एपिसोडचा प्रोमो रिलीज झाला आहे. या प्रोमोमध्ये श्वेता बच्चन बिग बींना एक हजाराव्या एपिसोडच्या चित्रीकरणावर प्रश्न विचारले. ‘केबीसीच्या प्रवासात माझे संपूर्ण आयुष्य बदलल्याचे’ बिग बी म्हणाले. दरम्यान केबीसीच्या पहिल्या एपिसोडपासूनचा संपूर्ण प्रवास दाखवण्यात आला. ज्यात एक करोड, पाच करोड आणि सात करोड रुपये जिंकणाऱ्या सर्व स्पर्धकांची झलक दाखवण्यात आली आहे. केबीसीच्या २१ वर्षांचा प्रवास १ मिनिटात मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा संपर्ण प्रवास पाहून बिग बींच्या डोळ्यात पाणी आलं. मात्र बीग बी कुठेही न थांबता ‘चला खेळ अजून बाकी आहे’, असं म्हणत पुन्हा एकदा नव्या जोशात खेळ सुरू करताना दिसले.

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या सोशल मीडियावर श्वेता नव्या यांच्यासोबतच्या फोटो शेअर केला आहे. सबसे प्यारी बेटी असं म्हणत बिग बींनी मुलीवरचे प्रेम व्यक्त केलं आहे. बिग बींच्या तीन पिढ्यांना एकत्र पाहूनी प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – IFFI: लेखक प्रसून जोशी यांचा इफ्फीकडून ‘फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर’ने सन्मान

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -