संजू बाबाने ‘केजीएफ- चॅप्टर २’चा शेअर केला पहिला लूक

संजू बाबाने ‘केजीएफ- चॅप्टर २’चा शेअर केला पहिला लूक

KGF Chapter 2: सिनेमा पुढील वर्षी होणार रिलीज

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार यशचा ‘केजीएफ- चॅप्टर १’ हा चित्रपट ब्लॉकबस्टर झाला होता. २५० कोटींची कमाई या चित्रपटाने केली होती. या घवघवीत यशानंतर निर्मात्यांनी केजीएफचा सिक्वल काढण्याचा निर्णय घेतला होता. नुकताचं या चित्रपटाचा पहिला लूक सोशल मीडियावर अभिनेता संजय दत्तने शेअर केला आहे.

गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात ‘केजीएफ- चॅप्टर १’ प्रदर्शित झाला होता. तामिळ, तेलगू, मल्याळम आणि हिंदी भाषेत हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता. ‘केजीएफ- चॅप्टर १’ ला कन्नड चित्रपटसृष्टीत अग्रणी स्थान मिळालं आहे. ‘केजीएफ’च्या सीक्वलमध्ये अभिनेता संजय दत्त महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. काही महिन्यांपू्र्वी संजयने या चित्रपटातील त्याच्या लूक सोशल मीडियावर शेअर केला होता. नुकताचं त्याने ‘केजीएफ- चॅप्टर २’चा पहिल्या लूक देखील इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

संजय दत्तने शेअर केलेल्या ‘केजीएफ- चॅप्टर २’ पहिल्या लूकमध्ये यश निळ्या शर्टमध्ये आणि काळ्या रंगाच्या पॅन्टमध्ये दिसतं आहे. हा पहिल्या लूक शेअर करताना संजू बाबाने असं लिहिलं आहे की, ‘दुसऱ्यांदा साम्राज्य स्थापन करणं इतकं सोप्प नसतं. केजीएफ चॅप्टर २ चा पहिला लूक.’

या चित्रपटात संजय अधीरा नावाची व्यक्तिरेखेत दिसणार आहे. तसंच प्रमुख भूमिकेत यश आणि श्रीनिधी शेट्टी असून या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत नीलने केलं आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे.


हेही वाचा – CAA: आंदोलनावर रितेश देशमुखने व्यक्त केला संताप!


 

First Published on: December 22, 2019 4:26 PM
Exit mobile version