घरमनोरंजनCAA: आंदोलनावर रितेश देशमुखने व्यक्त केला संताप!

CAA: आंदोलनावर रितेश देशमुखने व्यक्त केला संताप!

Subscribe

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी आवाज उठवत आहेत. आपलं मत सोशलमिडीयाच्या माध्यमातून मांडत आहेत. काही दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन चांगलंच चिघळलं. देशभरात पोलिसांनी हजारो आंदोलकांची धरपकड केली. यावेळी काही ठिकाणी आंदोलकांनी पोलिसांवर हल्ला केल्याचंही पहायला मिळालं.

अभिनेता रितेश देशमुखनेही ट्विटरच्या माध्यमातून आपलं मत व्यक्त केलं आहे. आणि एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये आंदोलक पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला करताना दिसत आहेत. आता ही परिस्थिती सहन होत नाही अशी प्रतिक्रीया दिली आहे.

- Advertisement -

रितेश ट्विटमध्ये म्हणतो की, “कोणत्याही परिस्थितीत हे सहन केलं जाऊ शकत नाही. शांततेत चालणाऱ्या आंदोलनामुळे मिळणाऱ्या यशात हे आंदोलक हिंसाचार भडकवून आणि दगडफेक करत अडथळा आणत आहेत. यांना अटक केली पाहिजे”. रितेशने आपल्या ट्विटमधून हिंसाचार न करण्याचं आवाहन केलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -