Video -‘महामारी लगी थी, घरों को भाग लिए थे सभी मज़दूर, कारीगर’ – गुलजार!

Video -‘महामारी लगी थी,  घरों को भाग लिए थे सभी मज़दूर, कारीगर’ – गुलजार!

ज्येष्ठ कवी गुलजार

लॉकडाऊनमध्ये मजुरांनी ‘गड्या आपला गाव बरा’ असं म्हणत गावाची वाट धरील. उपाशी पोटी मजुरांनी आपल्या कुटुंबाला घेऊन गावी जाण्याचा निर्णय घेतला कारण मजुरांच्या हातचे काम गेले. लॉकडाऊनचा सर्वात मोठा फटका मजुरांना बसला.  रोजंदारीवर जगणाऱ्या या मजुरांच्या हातात काम नाही. त्यात करोनाचाही धोका असल्याने आपल्या गावी परत जाण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. या स्थलांतरित मजुरांची व्यथा प्रसिद्ध गीतकार, कवी, लेखक गुलजार यांनी एका कवितेतून मांडली आहे.

“महामारी लगी थी

घरों को भाग लिए थे सभी मज़दूर, कारीगर.

मशीनें बंद होने लग गई थीं शहर की सारी

उन्हीं से हाथ पाओं चलते रहते थे

वगर्ना ज़िन्दगी तो गाँव ही में बो के आए थे…”

या त्यांच्या कवितेच्या काही ओळी आहेत. या स्थलांतरित मजुरांसाठी त्यांचं गाव, गावातील त्यांचे कुटुंबीय किती महत्त्वाचे आहेत, हे त्यांनी शब्दांतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

आजही लाखो मजूर आपल्या मूळ गावी परतण्यासाठी उपाशीपोटी भर उन्हात पायपीट करत आहेत. काहींनी मालवाहतुकीच्या ट्रकमधून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना अडवले आणि बेदम मारहाण केली. ट्रक मालकांवर गुन्हे नोंदवले. नोंदणीची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून ही मूळ गावी जाण्यासाठी त्वरीत व्यवस्था होत नसल्याने अगतिक झालेल्या परप्रांतीयांचे लोंढेच्या लोंढे महामार्गाने पायीच गावाकडे जात आहेत. काही जण रस्त्याने जाणाऱ्या कोणत्याही वाहनाला हात देऊन जर वाहन थांबलेच तर रवाना होत आहेत. अन्यथा पायीच जात आहेत.


हे ही वाचा – मी, मतकरी आणि आमची १० नाटकं!


 

First Published on: May 19, 2020 2:20 PM
Exit mobile version