Amitabh Bachchan Bungalow: बिग बींच्या प्रतिक्षा बंगल्याची भिंत तोडणार? काँग्रेसची लोकायुक्तांकडे तक्रार

Amitabh Bachchan Bungalow: बिग बींच्या प्रतिक्षा बंगल्याची भिंत तोडणार? काँग्रेसची लोकायुक्तांकडे तक्रार

Amitabh Bachchan Bungalow: बिग बींच्या प्रतिक्षा बंगल्याची भिंत तोडणार? काँग्रेसची लोकायुक्तांकडे तक्रार

बिग बी अमिताभ बच्चन यांच्या विलेपार्ले येथील प्रतिक्षा बंगला येथील भिंती रस्ते रुंदीकरणासाठी अडरसर ठरत असल्याने गेल्या अनेक दिवसांपासून भिंत चर्चेचा विषय ठरली होती. मुंबई महापालिकेनं रस्ते रुंदीकरणासाठी कोणती पावलं उचलली, याचा चार आठवड्यात अहवाल सादर करावा, असे आदेश लोकायुक्तांनी दिले आहेत. रस्ते रुंदीकरणासाठी अमिताभ बच्चन यांच्या प्रतिक्षा बंगल्याचा काही भाग तोडणे गरजेचे असल्याचा अहवाल जुलै महिन्यात सीटी सर्व्हे अधिकाऱ्यांनी दिला होता. मात्र तरीदेखील बिग बींच्या बंगल्याच्या भिंतीवर कोणतीही कारवाई केली गेली नाही. त्यामुळे काँग्रेसने लोकायुक्तांकडे तक्रार केली आहे. मुंबई महापालिका लोकायुक्तांना अहवाल देताना कोणते कारण देणार पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मुंबईतील जुहू येथील संत ज्ञानेश्वनर मार्ग रस्त्याच्या रुंदीकरणासाठी २०१७मध्ये मुंबई पालिकेडून आजू बाजूच्या सर्व बिल्डिंग आणि बंगल्यांच्या मालकांना त्यांचा जागेचा काही भाग देण्यासाठी नोटीस बजावण्यात आली होती. त्यात अमिताभ बच्चन यांच्या प्रतिक्षा बंगल्याचा देखील समावेश आहे. पालिकेच्या नोटीसीवर बिग बींनी कोणतेही उत्तर दिलेले नाही. २०१७पासून बिग बींच्या प्रतिक्षा बंगल्यावर कारवाई करण्याची नोटीस आहे मात्र पालिकेने अद्याप त्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे याबाबत नगरसेविका ट्युलिप मिरांडा यांनी लोकायुक्तांकडे तक्रार केली. त्यांच्या तक्रार अर्जानुसार मुंबई पालिकेने चार आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

काही दिवसांपूर्वी प्रतिक्षा बंगल्याच्या बाजूला असलेल्या इमारतीतील भिंत रस्ता रुंदीकरणासाठी तोडण्यात आली. मात्र बाजूला असलेल्या बिग बींच्या बंगल्याच्या भिंतीवर कोणताही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे बाजूच्या इमारतीमधील रहिवाशांनी कोर्टात धाव घेतली होती. मात्र बिग बींच्या बंगल्यावर त्यावेळी कोणतीही कारवाई झाली नाही.


हेही वाचा – अभिनेत्री अमीषा पटेल विरोधात भोपाळमध्ये जामीनपात्र वॉरंट जारी

First Published on: November 30, 2021 12:25 PM
Exit mobile version