चॉकलेट बॉय गंभीर भूमिकेत? रणबीरचा शमशेरामधील लूक लिक

चॉकलेट बॉय गंभीर भूमिकेत? रणबीरचा शमशेरामधील लूक लिक

बॉलिवूडचा चॉकलेट हिरो रणबीर कपूर (Ranbeer Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांचा विवाह झाल्यापासून हे दोघे सतत चर्चेत आहेत. लग्नानंतर त्यांचे रोज नवनवे प्रोजेक्ट प्रेक्षकांसमोर येत आहेत. नुकताच या जोडीचा ब्रम्हास्त्र (Bramhastra) या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला. त्यातच, रणबीरचा आणखी एक प्रोजेक्ट समोर आला आहे. या चित्रपटातील त्याचा लूक लिक झाला असून त्याच्या फॅन्सने त्याच्या या अफलातून लुकचं तोंडभरून कौतुक केलं आहे. (Look from Shamshera leak, Ranbeer Kapoor in different roll)

हेही वाचा – Ranbir Rishi Kapoor : रणबीर कपूरने ऋषी कपूरवर नाराज होऊन सोडले होते घर

शमशेरा (Shamshera) हा नवा चित्रपट २२ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधीच त्याचा लुक लिक झाला आहे. अत्यंत रागीट आणि आक्रास्ताळ असलेला हा लूक प्रेक्षकांना प्रचंड भावला आहे. मानेपर्यंत रुळणारे केस, वाढलेली दाढी आणि लालबुंद चेहरा पाहुन चित्रपटातील त्याच्या भूमिकेविषयी थोडासा अंदाज येतो. त्याचा हा लूक पाहून त्याची भूमिका भन्नाट आणि वेगळी असणार यात शंका नाही.

हिंदीसह तमिळ आणि तेलुगू भाषेतही हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. गेल्या चार वर्षांपासून या सिनेमाचं शूट सुरू होतं. सिनेमाचं चित्रिकरण पूर्ण झालं असून तो आता प्रदर्शनाच्या मार्गावर आहे.

हेही वाचा – गुरू उठा ले अस्त्र जब । करे पाप का नाश…..’ब्रम्हास्त्र’ चित्रपटातील अमिताभ बच्चन यांचा फर्स्ट लूक शेअर

दरम्यान, रणबीर आणि आलिया यांची भेट ब्रम्हास्त्रच्या सेटवर झाली. त्यांच्या प्रेमाला इथूनच सुरुवात झाली. गेल्या ५ वर्षांपासून या चित्रपटाची दोघांचेही चाहते वाट पाहत होते. त्यातच, ब्रम्हास्त्र चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलरनंतर आता चित्रपट प्रदर्शनाकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. त्यातच रणबीरच्या या नव्या चित्रपटाची घोषणा झाल्याने चाहते भलतेच खूश झाले आहेत.

First Published on: June 18, 2022 5:48 PM
Exit mobile version