बहुप्रतीक्षित ‘नक्षलबाडी’ वेबसीरिज लवकरच प्रदर्शित

बहुप्रतीक्षित ‘नक्षलबाडी’ वेबसीरिज लवकरच प्रदर्शित

कोरोना आणि त्यानंतरच्या लॉकडाऊनमध्ये संपूर्ण जग हे स्तिमित झालेले असताना अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक डी निशाणदार यांच्या नेतृत्वाखालील ‘जिसिम्स’ने मनोरंजन क्षेत्रातील निर्मितीसाठी एक वेगळा मार्ग धुंडाळला. आपल्या वेब सिरीजचे गोवा येथे चित्रीकरण पूर्ण केले. ‘नक्षलबाडी’ या बहुप्रतीक्षित आणि लवकरच येऊ घातलेल्या वेबसीरिजची निर्मितीमागील कथाही अनोखी आहे. निर्माते आणि मराठी मनोरंजन क्षेत्रातील कलाकार आता कशाप्रकारे हिंदी वेब सिरीजच्या क्षेत्रात उडी घेत आहेत त्याचीसुद्धा ही एक आगळी कहाणी आहे.

निर्मात्यांनी या वेबसीरिजचा एक टीझर नुकताच प्रकाशित केला आहे. ‘नक्षलबाडी’ ही जंगलात राहणाऱ्या लोकांची त्यांच्या हक्कांसाठीची एक चळवळ असून व्यवस्थेविरुद्ध उभारला गेलेला तो एक लढा आहे. ही वेबसीरिज या चळवळीचा आणि लढ्याचा जवळजवळ प्रत्येक कंगोरा समोर आणते. त्यात मग आदिवासी आणि या गावकऱ्यांची त्यांच्या हक्कांपासून होणारी कुचंबना, ज्या नैसर्गिक संपत्तीवर त्यांचा अधिकार आहे त्यापासून त्यांना वंचित ठेवले जाणे किंवा राजकारणी आणि उद्योजक यांच्याकडून त्यांच्या हक्काच्या गोष्टींमधील मलिदा उकळला जाणे या सर्व बाबी या वेबसीरिजमध्ये आहेत.

‘नक्षलबाडी’ ही ‘जीसिम्स’ची पहिली वेबसीरिज असून लवकरच ती ‘झी ५’वर प्रदर्शित होणार आहे. ‘जीसीम्स’ (ग्लोबल स्पोर्ट्स एंटरटेनमेंट अंड मीडिया सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड) ही भारतीय मनोरंजन क्षेत्राच्या प्रत्येक घटकामध्ये कार्यरत आहे. त्यात चित्रपट, टेलिव्हिजन, वेबसीरिज, निर्मिती, टॅलेंट व्यवस्थापन आणि सॅटेलाइटसमूहन यांचा समावेश होतो. आता कंपनीने नव्या जमान्याच्या विषयांच्या निर्मितीमध्ये प्रवेश केला आहे. ‘समांतर’ या आपल्या सुपरहिट मराठी वेबसीरिजनंतर कंपनीने लॉकडाउनच्या काळातच ‘नक्षलबाडी’ या नवीन हिंदी वेबसीरिजची निर्मिती केली आहे. ही वेबसीरिज आता ‘ओटीटी’ व्यासपीठावर प्रदर्शित होण्यास सज्ज झाली आहे.


हेही वाचा – ‘झोंबिवली’चे शूट पूर्ण, दिग्दर्शकाने सांगितला शूटिंगचा अनुभव


 

First Published on: November 24, 2020 4:45 PM
Exit mobile version