शानचे नवे गाणे, ‘नो स्मोकिंग पापा’

शानचे नवे गाणे, ‘नो स्मोकिंग पापा’

शानचे नवे गाणे, ‘नो स्मोकिंग पापा’

असं म्हटलं जातं की, वडील हे मुलीचे पहिले मित्र असतात. वडील मुलींसाठी आदर्श असतात. वडील-मुलीच्या ह्याच सुंदर नात्याला डेडिकेट करणारे गाणे सुप्रसिध्द पार्श्वगायक शानने गायले आहे. शान ह्यांनी गायलेले ‘नो स्मोकिंग पापा’ हे सुंदर गाणे १ जानेवारी २०१९ ला लाँच होणार आहे. या गाण्याचा टिझर नुकताच लॉंच झाला आहे. या टिझरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा – पहिल्याच दिवशी ‘सिंबा’ची दणक्यात कमाई

मितेश-प्रितेशने केले संगीतबद्ध

व्हिडियो पॅलेसची प्रस्तुती असलेला डॉ. दीपा सुरेंद्र देसाई आणि अनुराज फास्टनर्स प्राइवेट लिमिटेड, आणि एडलिब्स प्रॉडक्शन्सचे ‘नो स्मोकिंग पापा’ हे गाणे प्रितीश कामतने लिहिले आहे. शानने गायलेल्या ह्या गाण्याला मितेश-प्रितेशने संगीतबध्द केलेले आहे. ह्याचा टिझर नुकताच लाँच झाला आहे.

हेही वाचा – Birth Anniversary : सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या आठवणींना उजाळा

काय म्हणाला शान?

आपल्या गाण्याविषयी शान म्हणाला, “मी नुकतेच हे गाणे पाहिले. हे गाणे जेवढे सुरेल झाले आहे. तेवढाच ह्याचा व्हिडीयोही मस्त झाला आहे. जेव्हा एखाद्या चांगल्या गाण्याचा तेवढाच सुंदर व्हिडीयो होतो, तेव्हा ते गाणे ऐकणे आणि पाहणेही खूप मजेदार असते. ह्या गाण्याच्या शेवटी एक छान ट्विस्ट आहे. जो मला अत्यंत आवडलाय. गाण्याचा टिझर नुकताच लाँच झालाय. ज्याचा मला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. आणि मला पूर्ण विश्वास आहे, की जेव्हा हे गाणे रिलीज होईल, तेव्हा हे लोकांच्या पसंतीस उतरेल.”


हेही वाचा – आसाममध्ये गायक शानवर दगडफेक

First Published on: December 29, 2018 5:01 PM
Exit mobile version