घरट्रेंडिंगBirth Anniversary : सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या आठवणींना उजाळा

Birth Anniversary : सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या आठवणींना उजाळा

Subscribe

एकापाठोपाठ एक १५ सुपरहिट चित्रपट देणारे राजेश खन्ना हे बॉलीवूडचे पहिला सुपरस्टार ठरले.

दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांची आज ६७ वी जयंती. बॉलीवूडचे पहिले सुपरस्टार म्हणून नावारुपाला आलेले राजेश खन्ना यांचे नाव आजही लोक तितक्यात आदराने घेतात. राजेश खन्ना त्यांच्या अजरामर कलाकृतीच्या माध्यमातून आजही आपल्यामध्ये जिवंत आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीत लागोपाठ १५ सुपरहिट चित्रपट देण्याचा रेकॉर्ड राजेश खन्ना यांच्या नावावर आहे. बॉलीवूडमध्ये ते ‘काका’ या टोपणनावाने प्रसिद्ध होते. ‘काकांचे’ चित्रपच म्हटले की प्रेक्षागृहात गर्दी होणार नाही हे अशक्यच. 

त्यानंतर १९६९ साली आलेल्या ‘आराधना’ चित्रपटाद्वारे काका देशातल्या प्रत्येक घरात पोहोचले. आराधनामध्ये त्यांनी साकारलेला डबल रोल (दुहेरी भूमिका) प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आणि रातोरात काकांच्या चाहत्यांची संख्या कित्येक पटीने वाढले. आराधना पाठोपाठ दो रास्ते, सफर, हाथी मेरे साथी, अमर प्रेम, आनंद एकाहून एक सुपरहिट ब्लॉकबस्टर चित्रपट त्यांनी केले. या प्रत्येक चित्रपटातील आपल्या दमदार अभिनयामुळे काकांनी खरोखरच आपण बॉलीवूडचे सुपरस्टार असल्याचे सिद्ध करुन दाखवले. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये १९६९ ते १९७२ हा ३ वर्षांचा काळ सुवर्ण काळ ठरला. या काळात राजेश खन्ना यांनी लागोपाठ १५ सुपरहिट चित्रपट दिले.

- Advertisement -
राजेश खन्ना यांच्या व्यावसायिक आयुष्याइतकच त्यांचं खासगी आयुष्यही चर्चेचा विषय ठरलं. एक काळ असा होता जेव्हा राजेश खन्नांसाठी अनेक तरूणी त्यांच्या रक्ताने पत्र लिहीत असतं. इतकंच नाही तर असं म्हणतात की राजेश खन्ना यांच्या गाडीवर तरूणींनी मुके घेतल्याचे ठसे असायचे. लाखो – करोडो लोकांना वेड लावणारा हा अवलिया, डिंपल कपाडियासोबतच्या लग्नामुळेही चांगलाच चर्चेत राहिला. त्याकाळी काकांनी आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या डिंपल कपाडिया यांच्याशी विवाह केला आणि जगभरात याचा गवगवा झाला. चित्रपटसृष्टीतील अनेक आघाडीच्या नट्यांसोबत त्यांचं नाव जोडलं गेलं. मात्र, पत्नी म्हणून त्यांनी डिंपल यांचीच निवड केली. अखेरपर्यंत राजेश आणि डिंपल हे कपल नेहमीच चर्चेत राहिलं.

१८ जुलै २०१२ रोजी बॉलीवूडच्या या पहिल्या-वहिल्या सुपरस्टारने जगाचा निरोप घेतला. देशातून आणि देशाबाहेरून लाखो चाहते काकांना अखेरचा निरोप देण्यासाठी जमले होते. आयुष्यभर ज्या थाटात राजेश खन्ना राहिले तितक्याच दिमाखात चाहते आणि बॉलीवूड परिवाराने त्यांना ‘अलविदा’ केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -