घरमनोरंजनआसाममध्ये गायक शानवर दगडफेक

आसाममध्ये गायक शानवर दगडफेक

Subscribe

आसाममधील गुवाहाटीमध्ये एका कार्यक्रमादरम्यान गायक शानला अतिशय वाईट वागणूक देण्यात आली. त्याच्यावर दगडफेक करण्यात आली. सोशल मीडियावर शानने आपला संताप व्यक्त केला

बॉलीवूडमधील सुपरस्टार असणार्‍या आणि आपल्या मधुर आवाजाने सगळ्यांना मंत्रमुग्ध करणार्‍या गायक शानला एका वाईट अनुभवाला आसाममध्ये सामोरे जावे लागले आहे. आसाममधील गुवाहाटीमध्ये सरूसजाई स्टेडियममध्ये शानच्या म्युझिक कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. याच कार्यक्रमादरम्यान शानला अतिशय वाईट वागणूक देण्यात आली.

नक्की काय झाले?

शानची कॉन्सर्ट गुवाहाटीमध्ये आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमामध्ये अनेक लोक आले होते. कार्यक्रमादरम्यान शानने एक बंगाली गाणे म्हणायला सुरुवात केली. मात्र तेथे जमलेल्या प्रेक्षकांना शानने गायलेले हे गाणे आवडले नाही. त्यामुळे त्यांनी शानच्या अंगावर कागदाचे बोळे आणि दगडफेक केली. इतकंच नाही तर तिथे असलेल्या मालमत्तांचे नुकसानही यावेळी उपस्थित असलेल्या श्रोत्यांनी केले. यावेळी काही खुर्च्याही तोडण्यात आल्या ज्याचा व्हिडिओ सोशम मीडियावर व्हायरल झाला आहे.

- Advertisement -

शानने ट्विट करून केला संताप व्यक्त

या कार्यक्रमानंतर शानने आपला राग ट्विट करून व्यक्त केला. कोणत्याही कलाकाराबरोबर अशा तर्‍हेने वागणं योग्य नसल्याचं यावेळी शानने म्हटलं आहे. प्रत्येक कलाकार हा त्याच्या मेहनतीने पुढे येत असतो. त्यामुळे त्याच्या कलेचा मान राखावा. माझी तब्बेत ठीक नसतानाही तुमच्या मनोरंजनासाठी मी तिथे आलो आणि तुमच्यासाठी परफॉर्म करत होतो. मात्र मला असा प्रतिसाद मिळणार असेल तर मलाही तुमच्यासमोर माझी कला सादर करण्यात अजिबात स्वारस्य नाही अशा शब्दात शानने आपला राग व्यक्त केला. शान हा बॉलीवूडमधील नावाजलेला गायक असून आतापर्यंत त्याने अनेक कलाकारांसाठी आपला आवाज दिला असून त्याची बरीच गाणी गाजली आहेत. दरम्यान त्याच्या ट्विटनंतर आसाममधील काही नागरिकांनी त्याच्या झालेल्या अपमानाबद्दल आणि लोकांच्या वागणुकीबद्दल माफीही मागितली आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -